
रिपल डोंगरे यांचा नागपुरात सन्मान
:- महाविद्यालयीन अध्यक्ष पदावर निवड झाल्याबद्दल झाला सत्कार.
आर्वी:- विद्यार्थ्यासाठी आकर्षक असलेली यिन महाविद्यालयीन निवडणूक नुकतीच पार पडली. यिन दरवर्षी महाराष्ट्रातील सर्वच कॉलेज व महाविद्यालयात ही निवडणूक राबवत असते त्याचप्रकारे यावर्षी सुद्धा यिनची निवडणूक राबविण्यात आली,आर्वी येथील शासकिय तंत्रनिकेतन कॉलेज मध्ये सुद्धा ही निवडणूक राबविण्यात आली यात कॉलेजच्या अध्यक्ष पदासाठी रीपल डोंगरे यांची बिन विरोध निवड झाली ,डोंगरे यांच्या विरोधात कॉलेज मधील कोणत्याही विद्यार्थ्यांनी अर्ज न भरल्याने दिनांक १३/३/२०२३ ला रीपल ची बिनविरोध निवड झाली.दिनांक १४ मार्च नागपुर येथे यिनचे एकदिवसीय विभाग स्तरीय अधिवेशन झाले त्यात रीपल डोंगरे यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.त्यांच्या या निवडी बद्दल त्यांना राजकीय पक्षा कडून शुभेच्छा प्राप्त होत आहे व पुढील वाटचालीस त्यांना अनेक नेत्यांनी शुभेच्छा दिल्या आहे.
