
प्रतिनिधी::प्रवीण जोशी
यवतमाळ
ढाणकी हे ३० ते३५ हजार लोक संख्येचे शहर त्यातच ३० ते ४० खेडे हे ढाणकी शहरावर अवलंबून परंतु एवढे असून सुद्धा ढाणकीला अद्याप तलाठी नाही. प्रदीप कुमार शिवणकर हे गेल्या अनेक दिवसांपासून ढाणकी खंड १ चे तलाठी म्हणून कार्यरत होते त्यांची बदली उमरखेड येथील कुपटी या महसूल मंडळात मंडळाधिकारी म्हणून झाली ढाणकी येथे असताना त्यांची कारकीर्द ही वाखण्याजोगी होती.परंतु त्यांची बदली झाल्या पासुन अद्याप ढाणकी खंड १ साठी पूर्णतहा काम करणारे तलाठी नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची व आजूबाजूच्या खेड्यातील लोकांची चांगलीच हेळसांड होत आहे. गावात काम करणारा तलाठी गाव-पातळीवरील नोंदवह्यांचे दप्तर एकूण १ ते २१ क्रमांकाच्या गाव नमुन्यांमध्ये ठेवतो. तलाठी हा गावातील सर्व जमिनीच्या व्यवहारांची नोंद करत असतो. गावातील शेत जमिनीचा सात बारा, आठ अ, या सर्व बाबी तलाठी देत असतो. हक्कसोड, वारसाहक्क अशा अनेक नोंदी तलाठ्यांना घ्याव्या लागतात. याशिवाय जनगणना, विविध प्रकारची सर्वेक्षणे तसेच आपत्तीमधील पंचनामे ही कामेही तलाठ्यांनाच करावी लागतात. अशातच काही दिवसा पूर्वी बऱ्याच शेतकऱ्यांचे पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे अद्याप झालेले नाहीत तसेच,किसान योजनेचा लाभ बऱ्याच शेतकऱ्याला मिळत नाही,शेतकऱ्यांचा आपापसात धुऱ्यासाठी अथवा रस्त्याविना भानगडी उपस्थित होत असतात.तर दाद मागायची कुठे ?सातबारा काढायचा असल्यास तलाठी नाही. ढाणकी खंड १चा पदभार हा डोंगरे तलाठी यांच्याकडे दिला गेला आहे.त्यांच्याकडे चिंचोली (ढा) ढाणकी खंड २ इथे कामाचा व्याप जास्त असल्यामुळे ते तिकडचेच कामे पहात आहेत.ऑफिसला तलाठी साहेबास पहावयास गेल्यास तिथे कोतवाल हजर असतो .साहेब कामा निमित्त बाहेर गेलेले आहेत.त्यामुळे आज भेटणार नाही उद्या या ,उद्याला गेल्यास तीच परिस्थिती साहेबास फोन लावल्यास मोबाईल नॉट रीचेबल त्यामुळे ढाणकीकर त्रस्त आहेत. त्यामुळे लवकरात लवकर ढाणकी विभागात पूर्वी प्रमाणेच पूर्णवेळ काम करणारे तलाठी ढाणकी१ साठी देण्यात यावा अशी शहरवासीयांची व आजुबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांची मागणी आहे.
