
सहसंपादक : रामभाऊ भोयर
दर सीसीआय पेक्षा अधिक असल्याने खुल्या बाजारातील दराने सीसीआयच्या दराला ओव्हरटेक केल्याचे चित्र आहेत . सध्या सीसीआय चांगल्या प्रतीच्या कापसाला क्विंटल मागे आठ हजार दहा रुपये दर देत आहेत तर खुल्या बाजारामध्ये चांगल्या कापसाला आठ हजार 180 रुपये दर मिळत आहेत कापसाची सरकी तसेच गठाणीचे दर हे वाढलेले आहेत सोबतच सरकारने आयात केलेल्या कापसावरती दहा टक्के शुल्क लावले आहेत या सर्व घटनांचा एकत्रित परिणाम होऊन खुल्या बाजारामध्ये कापसाचे दर हे वाढलेले आहेत कापसावर आयात शुल्क लावल्यामुळे विदेशातून येणारा कापूस हा महाग पडतो तुलनेने आपल्या येथील चांगल्या प्रतीचा कापूस हा योग्य भावात मिळत आहेत यामुळे कापसाच्या भावात तेजी येऊ शकते यावर्षी हंगामाच्या सुरुवातीला कापसावरील आयात शुल्क हटवल्यामुळे तसेच सरकी व गठाणी मध्ये सुद्धा तेजी नसल्याने खुल्या बाजारामध्ये कापसाचे दर हे दबावात होते परिणामी कापूस विकण्यासाठी शेतकऱ्यांचा कल हा सीसीआयकडे होता अनेक शेतकऱ्यांनी आपला कापूस हा सीसीआयला दिला राळेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचा विचार केला असता बाजार समितीमध्ये एकूण चार लाख तीन हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली आहेत त्यामध्ये खुल्या बाजारामध्ये दोन लाख 34 हजार तर सीसीआयने एक लाख 70 हजार क्विंटल कापसाची खरेदी केली आहेत राळेगावचा परिसर हा कापसाचा बेल्ट म्हणून ओळखला जातो या बेल्ट मध्ये यावर्षी कापसाचे उत्पादन हे अर्ध्यावर आले आहेत हंगामाच्या सुरुवातीला खाजगी व्यापाऱ्यांना कापूस कमी मिळाला तसेच कापसाचे उत्पादन अर्ध्यावर असल्याने व व्यापाऱ्यांना कापसाची गरज असल्याने भविष्यातही कापसाचे दर हे वाढू शकतात असे जाणकारांचे म्हणणे आहेत शेतकऱ्यांच्या कापसाचा विचार करता अजूनही 30 ते 40% शेतकऱ्याकडे कापूस असू शकतो त्या शेतकऱ्यांना कापसाच्या भाव वाढीचा फायदा होऊ शकतोllllll गेल्या दोन वर्षातील उच्चांकी दर गेल्यावर्षी कापसाला सात हजार ते सात हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान दर मिळाला त्याच्या आदल्या वर्षी सुद्धा अशीच परिस्थिती होती यावर्षी कापसाला आठ हजार रुपये किंवा त्यापेक्षा जास्त दर मिळत असल्याने मागील दोन वर्षाचा विचार करता यावर्षी कापसाला चांगला दर मिळत आहे जो कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी काहीसा समाधानकारक आहे कारण कापसाचे उत्पन्न व खर्च पाहता कापसाला कमीतकमी दहा हजार रुपये प्रति क्विंटल भाव हवा तेव्हाच शेतकऱ्यांना कापसाची शेती ही परवडू शकते
