

राळेगाव :— वडकी पोलीस स्टेशन अंतर्गत बोरी इचोड नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरून दोन वर्षीय चिमुकलीला कडेवर पायदळ घेऊन आजोबा वडकी कडे जात असताना अज्ञात वाहनाने धडक दिली असता या धडकेत दोन वर्षीय नायराचा जागीच मृत्यू झाला तर आजोबा गणपत परचाके हा गंभीर जखमी झाल्याची घटना बोरी ईचोड गावाजवळ दिं. २३ एप्रिल २०२५ रोज बुधवारला ३:३० वाजताच्या दरम्यान घडली आहे सविस्तर वृत्त असे नायरा गणेश कुंमरे २ वर्षे या अपघातात मृत्यू पावलेल्या चिमुकलीचे नाव असून ४५ वर्षीय गणपत परचाके या गंभीर जखमी झालेल्या इसमाचे नाव आहे.गणपत परचाके हा बोरी ईचोड येथून आपल्या दोन वर्षीय चिमुकल्या नातीला कडेवर घेवून वडकी कडे जात होता .तो रोड क्रॉसिंग करत असताना भरधाव वेगात येणाऱ्या अज्ञात वाहनाने गणपत परचाके याला धडक दिली असून या धडकेत दोन वर्षीय चिमुकली नायराचा जागीच मृत्यू झाला तर गुणवंत परचाके गंभीर जखमी झाला असून सदर घटनेची माहिती राष्ट्रीय महामार्ग कर्मचारी व वडकी पोलीस स्टेशनला कळताच घटनास्थळी पोलीस व राष्ट्रीय महामार्ग कर्मचारी दाखल झाले असून अपघातातील जखमीला वडनेर येथे रुग्णालयात उपचाराकरिता पाठविण्यात आले मात्र अपघातात तर दोन वर्षीय नायाराचा मृत्यू झाल्याने घटनास्थळी नातेवाईकांनी हंबरडा फोडला .
या झालेल्या अपघातात वाहन चालकाने घटनास्थळावरून पळ काढला असून या अज्ञात वाहन चालकाचा शोध वडकी पोलीस घेत आहे.
