चोरट्यानी दुकान फोडून सोयाबीनचे कट्टे लंपास केले

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

दिग्रस ते आर्णी रस्त्यावरील काॅलीनी जवळ शनिवारच्या मध्यरात्री चोरट्यानी दुकानाचे शेटर तोडून सोयाबीनचा माल लंपास केला आहे.
दिग्रस ते आर्णी रस्त्यावरील कॉलनी जवळ सुभाष शामराव जाधव यांच्या दुकानाचे शेटर तोडून सोयाबीनचे ६२ कट्टे ३५ क्विंटल माल त्याची कींमत २ लाख१० हजार रुपयांचा असून हा माल लंपास करीत असताना गस्तीवर असलेल्या पोलिसांना आढळला. याची चौकशी करीत असताना तितक्या दुकान फुटल्याचे माहिती मिळताच पोलिसांनी वाहन ताब्यात घेवून एका चोरट्याला ताब्यात घेण्यात यश आले. बाकी चोरटे फरार झाले आहेत. या घटनेची तक्रार सुभाष जाधव यांनी दिग्रस पोलिसात दिली असून.यावर पोलीस निरीक्षक सोनाजी आमले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे सोयाबीनचा माल हाती लागला आहे.