
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
राळेगाव येथील कवी साहित्य तथा गझलकार म्हणून परिचित असलेले प्रसिद्ध व्यक्तिमत्व गजेंद्र कुमार ठूने यांची पहिल्या जिल्ह्यस्तरीय साहित्य संमेलनातील गझल मुशायऱ्यासाठी निमंत्रित गझलकार म्हणून निवड झाली आहे.
दिनांक 4 डिसेंबर रोजी होणाऱ्या पहिल्या जिल्हास्तरीय साहित्य संमेलन यवतमाळ येथे होणार असून संमेलनाध्यक्ष डॉक्टर मिर्झा रफी यामध्ये यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या संमेलनात गझल मुशायऱ्यासाठी गजेंद्र कुमार ठूने राळेगाव. त्यांची निवड करण्यात आली आहे .
यवतमाळ जिल्हा साहित्य मंच द्वारा आयोजित वराडी कवी स्व. सुहास भाऊ राऊत व कवी अशोक मारावार त्यांचे स्मृतिप्रित्यर्थ आयोजित पहिल्या यवतमाळ जिल्हा साहित्य संमेलन यवतमाळ येथे आयोजित करण्यात आले आहे. प्रसिद्ध कवी हास्य सम्राट डॉक्टर मिर्झा रफी अहमद बेग यांच्या यांची संमेलनाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे या साहित्य संमेलनात गझल मुशायऱ्यासाठी स्व कलीम खान स्मृती गझल मुशायरा आयोजित करण्यात आला असून यामध्ये राळेगाव येथील साहित्यिक, कवी, गझलकार, गजेंद्र कुमार ठूने यांची निवड करण्यात आली आहे निमंत्रित गझलकार म्हणून निवड करण्यात आली आहे.
यवतमाळ जिल्हा साहित्य मंचद्वारे आयोजित या पहिल्या वहिल्या जिल्हा साहित्य संमेलन यवतमाळ सहकार सांस्कृतिक भवन येथे होणार असून यामध्ये कवी संमेलन गझल मुशायरा ई. साहित्याची मेजवानी मिळणार असून या गझल संमेलनाला व साहित्य संमेलनाला माजी आमदार प्राध्यापक वसंत पुरके यांची उपस्थिती राहणार असून झी टीव्ही हास्य सम्राट फेम डॉक्टर मिर्झा रफी अहमद बेग हे संमेलन अध्यक्ष लाभलेले आहे.
राळेगावातील ग्रामीण भागातून आपल्या कवितेच्या माध्यमातून अनेक वृत्तपत्रातून आपल्या कविता लिहिणारे गजेंद्र कुमार ठूने यांनी आजवर अनेक साहित्य संमेलनात निमंत्रित कवी म्हणून गझलकार म्हणून छाप सोडली असून त्यांनी आतापर्यंत अनेक स्पर्धा जिंकले आहे. पहिल्या यवतमाळ जिल्हा साहित्य संमेलना निमंत्रित गझलकार म्हणून त्यांची झालेल्या निवडीने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
