लेप्टनंट कर्नल वासुदेव आवारी यांचा मृत्यदेह रात्री ८ पर्यंत वणीत दाखल होणार,मानवंदना देण्यासाठी तालुक्यातील हजारो नागरिक राहणार उपस्थित

वणी :- भारतीय सैन्यात लेप्टनंट कर्नल या पदावर कार्यरत असलेले वासुदेव दामोधर आवारी यांचे काल ता. ४ रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास चायना बॉर्डरवर कर्तव्यावर असताना हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने आकस्मित निधन झाले असता त्यांचा मृतदेह आज रात्री ९ वाजेपर्यंत त्यांचे मूळ गावी मूर्धोनी येथे दाखल होणार आहे. त्यांचेवर उद्या शुक्रवार ता. ७ रोजी सकाळी ११ वाजता अत्यंविधी पारपडणार आहे. त्यांच्या अंतविधीला तालुक्यातून हजारो लोक सहभागी होणार असल्याचा अंदाज व्यक्त केल्या जात आहे.

चीन व लडाकच्या सीमेवर आपले कर्तव्य बजावत असताना लेप्टनंट कर्नल वासुदेव आवारी यांना हृदय विकाराचा झटका आला व त्यांचा मृत्यू झाला. उत्तराखंड येथील सैन्याच्या रुग्णालयात त्यांचे शवंविच्छेदन करण्यात आले असुन सैन्यातील सर्व विधी व अखेरची सलामी देऊन त्यांचा मृत्यदेह विमानाने नागपूर येथील विमान तळावर दुपारी ४.३०ला दाखल होणार आहे. त्या ठिकाणी देखील नागपूर येथील भारतीय सैन्याकडून त्यांना मानवंदना देण्यात येणार आहे. व नंतर शासकीय वाहनाने त्यांना वणीत आणण्यात येणार आहे. वणीत ही त्यांना रात्री पोलीस प्रशासना कडून मानवंदना अर्पण करण्यात येणार आहे. व त्या नंतर त्यांचा मृतदेह त्यांचे मूर्धोनी गावाकडे नेण्यात येणार आहे. त्यांचेवर उध्या शुक्रवार ता. ७ रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास अंत्यविधी पार पडणार आहे. त्यांच्या अंतदर्शनासाठी तालुक्यातून हजारो नागरिक उपस्थित असणार आहे अशी माहिती मिळाली आहे.