मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमात लखाजी महाराज विद्यालय तालुक्यातून प्रथम तर जिल्ह्यांतून तिसरी

सहसंपादक : रामभाऊ भोयर

नुकतेच शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा उपक्रम सुरू केला यामध्ये शासनाच्या निकषांवर आधारित अनेक मुद्यांवर आधारित शिक्षण विभागाने अवलोकन करून मुल्यमापन केले असता शासनाच्या सर्व निकषानुसार श्री लखाजी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय राळेगाव तालुक्यातून सर्वतोपरी सरशी ठरल्यामुळे राळेगाव तालुक्यातील माध्यमिक विद्यालयातून पहिल्या क्रमांकाची शाळा घोषित करण्यात आल्यामुळे प्रथम क्रमांक पटकावला असून विद्यालयाला रोख तीन लाख रुपये पारितोषिक घोषित करण्यात आले असून जिल्ह्यातील प्रथम क्रमांक प्राप्त झालेल्या सोळा शाळा जिल्ह्यावर जिल्हा समितीकडे पाठविण्यात आल्यानंतर जिल्ह्यातून सुद्धा राळेगाव तालुक्यानी म्हणजेच लखाजी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय झाडगाव यांनी तिसरा क्रमांक पटकावला आहे व तीन लाखांचे बक्षीस जिल्ह्यावर सुद्धा पटकावले असून या उपक्रमात यशस्वी होण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष दिलीप कोल्हे, संस्थेचे माजी अध्यक्ष तथा जेष्ठ संचालक चित्तरंजन कोल्हे, उपाध्यक्ष आशिष कोल्हे, सचिव रोशन कोल्हे , संचालक भरत पाल, दिलीप देशपांडे,सुरेश गंधेवार, गुलाबराव महाजन,शेखरराव झाडे ,सरोजनीताई कोल्हे यांचे मार्गदर्शनाखाली कार्य केले असून या कार्यात विद्यालयाचे प्राचार्य विलास निमरड, जेष्ठ शिक्षक रमेश टेंभेकर,दिगांबर बातुलवार ,श्रावनसिंग वडते,रंजय चौधरी, राजेश भोयर,मोहन आत्राम, मोहन बोरकर,विशाल मस्के,सौ.कुंदा काळे,सौ.वंदना वाढोणकर,सौ.वैशाली रोहणकर,सौ.दिपाली कोल्हे,कु‌ अश्विनी तिजारे,कु.रूचिता रोहणकर, सोबतच वरिष्ठ लिपिक वाल्मिक कोल्हे, कनिष्ठ लिपिक पवन गिरी, प्रयोगशाळा सहाय्यक शुभम मेश्राम,तथा बाबुलाल येसंबरे, विनोद शेलवटे यांनी अथक परिश्रम घेतले असून विद्यार्थ्यांनी सुद्धा आपला सहभाग नोंदविला होता.यामुळे तालुक्यात आनंदी आनंद व्यक्त होत आहे.