
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील रिधोरा येथे १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर या कार्यक्रमात वकृत्व स्पर्धा अ गट व कृत्व स्पर्धा ब गट तसेच किल्ले प्रदर्शनी, रांगोळी स्पर्धा, अशा विविध कार्यक्रमाला चे आयोजन करण्यात आले होते. सदर अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजित करण्यात आले होते सदर अ गटातील वकृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक रुपेश रेंगे झाडगाव यांनी तर द्वितीय क्रमांक गजेंद्र ठाणे राळेगाव यांनी पटकावला तर तृतीय क्रमांक सुजाता दीपक पवार रिधोरा यांनी पटकावला तर चतुर क्रमांक संजना विनोद गाउत्रे त्यांनी पाठवला तर ब गटातील प्रथम क्रमांक राजश्री पांडू भेदुरकर, तर द्वितीय क्रमांक युगांशु सातघरे तर तृतीय क्रमांक ओम पिंटू शेंडे यांनी पटकावला तर चतुर पुरस्कार सक्षम मंगेश शेंडे यांनी पाठवला आहे सदर या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाला उपस्थित प्रवीण कोकाटे माजी सभापती राळेगाव, डॉ नरेंद्र इंगोले माजी सरपंच वडकी, उमेश गौऊळकार सरपंच, उपसरपंच टिनूताई ठेवणे, पोलीस पाटील ढगे सर मांदळे तंटामुक्त अध्यक्ष भानुदास आडे हरीश काळे अनंतरावजी वाढंई , ह भ प नामदेवराव महाराज वाढंई , निखिल कडू गजानन पवार, बाबारावजी गौउळकार , दीपक पवार, कवडू राऊत, कडू ढोले, अमोल गौउळकार , अरविंद गाउत्रे , राजू गुरनुले, सुभाष वाटगुळे, शरद सातघरे वृषाली पवार यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडला आहे सदर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयूर पंडिले यांनी केले आहे तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सागर निरगुडवार यांनी केले आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता मयूर अंकुश पंडिले, सागर प्रभाकर, निरगुडवार, चंद्रशेखर लेनगुरे, आशिष करपते, मनोज भाटाडे, शुभम येरणे, राजू निरगुडवार, विलास पवार, विठ्ठल गुरनुले, पांडू सोनुले, सुमित मेघरे, सचिन सातघरे व साया बहुउद्देशीय संस्था, गुरुदेव सेवा मंडळ, बिरसा मुंडा समिती, यार वाला ग्रुप, यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.
