
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्याला लाभलेला मोठा सांस्कृतिक व धार्मिक वारसा असताना माता सीतेचे या तालुक्यांमध्ये रावेरी येथे मोठे मंदिर असून संपूर्ण भारत वर्षामध्ये अतिशय नावलौकिक पावलेली अतिशय मोठे पुरातन धार्मिक महत्त्व प्राप्त असलेले माता सीतेच्या या मंदिराला साक्षी ठेवत राळेगाव तालुक्यातील सकल हिंदू समाजाच्या वतीने विशाल हिंदू समालनाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
त्याच अनुषंगाने दिनांक 24 फेब्रुवारी रोजी राळेगाव शहरात सुद्धा मोठे विशाल हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून समाजामध्ये निर्माण झालेल्या वेगवेगळ्या समस्यांना हात लावत आज हिंदू समाजाचे एकत्रीकरण अत्यंत आवश्यक असल्याने समाजाला संतांच्या मार्गदर्शनाची व त्यांच्याकडून उत्तराची अपेक्षा असल्याने. हिंदू संमेलनाचे आयोजन सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आले असून या कार्यक्रमाकरिता अयोध्या येथील संत परम पूजनीय श्री भागीरथीजी महाराज महात्यागी दिगंबर आखाडा यांचे विशाल हिंदू समाजाला आर्शीवचन लाभणार असून. प्रमुख वक्ते म्हणून सतपाल सोवळे हे राहणार असून या कार्यक्रमाकरिता मुख्य उपस्थिती कु. आकांक्षा वर्मा शक्ती साधना केंद्र म्हणून ह्या उपस्थित राहणार आहे. त्यामुळे या विशाल हिंदू संमेलनाला समाजातील मोठ्या संख्येने हिंदू समुदाय सुद्धा उपस्थित राहणार असल्याने या संमेलनाच्या अनुषंगाने दुपारी दोन वाजता भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले असून या शोभायात्रेमध्ये सर्व सकल हिंदू समाजाने सहभागी व्हावे तद्वतच दुपारी पाच वाजता गांधी मैदान येथे विशाल हिंदू संमेलनामध्ये सर्वांनी या विशाल हिंदू संमेलनामध्ये उपस्थित राहावे असे आवाहन सकल हिंदू समाजाच्या वतीने राळेगाव शहर व परिसरातील हिंदू बांधवांना करण्यात येत आहे.
