आंजी येथे महिलांचे प्रशिक्षण व स्वयंरोजगार मार्गदर्शन शिबीर

सहसंपादक: – रामभाऊ भोयर

राळेगाव पंचायत समिती अंतर्गत आंजी ग्रामपंचायत येथे महिलांना पेसा योजने अंतर्गत कायद्याची माहिती व योग्य अमलबजावणी व्हावी यासाठी आंजी येथे दिं १३ जून २०२३ रोज मंगळवारला महिलांचे प्रशिक्षण व स्वयंरोजगार मार्गदर्शन शिबीर घेण्यात आले.
या प्रशिक्षण व स्वयंरोजगार शिबिरात मॉष्टर ट्रेनर म्हणून ठवकर मॅडम यांनी महिलांना वनहक्क अधिनियम (PRA) व पेसा बाबत कायद्याची अमलबजावणी व अधिकार या बाबत मार्गदर्शन केले.
यावेळी ग्रामपंचायतीने गावातील ग्रामपंचायतीने कर वसुली ७५ टक्के करून गाव हागणदारी मुक्त करण्यात आले तसेच संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान यशस्वी पणे राबवून उत्कृष्ट प्रभाग गटाचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस प्राप्त झाले गावात मागील पाच वर्षात कोणतेही प्रकारची साथ न लागल्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून चंदेरी कार्ड मिळवून देण्यात आले तसेच १४ वित्त आयोग निधी १००% खर्च करून १५ वा वित्त आयोगाचा निधी ९०% खर्च करण्यात आलेला आहे यात एनपीए अंतर्गत महिला स्नेही व बालस्नेही या दोन थीमवर उत्कृष्ट काम केले तसेच अपंगांना पाच टक्के महिला बालकल्याण १०% मागासवर्गीय १५ टक्के खर्च केला , ग्रामपंचायत अंतर्गत वनराई बंधारे राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत रखडलेली नळ योजना शंभर टक्के पूर्ण करून घरोघरी शंभर टक्के नळ कनेक्शन देऊन गावातील पाणी समस्या कायमस्वरूपी सोडवली तसेच शाळा अंगणवाडी ग्रामपंचायत डिजिटल व सोलर वर करण्यात आली आहे सीएससी केंद्र मार्फत सर्व आवश्यक डिजिटल सुविधा पुरविण्यात आले आहेत बचत गटातील महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा म्हणून पेसा अंतर्गत मच्छी तलाव बचत गटांना देण्यात आला आहे तसेच ग्रामपंचायत आंजी आयएसओ करण्यात आली असून संपूर्ण शासकीय इमारतीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले आहे आदी प्रकारची कामे ग्रामपंचायतिच्या माध्यमातून करण्यात आली असल्याची माहिती गावच्या सरपंच सौ.ताराबाई सोयम व उपसरपंच प्रफुल पवार व सदस्यांनी तसेच सचिव शंकर मुजमुले यांनी सांगितली असून पेसा योजनेबाबत माहिती व मार्गदर्शन केले या प्रशिक्षण व स्वयंरोजगार शिबिराला गावातील पुरुष व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते