
सहसंपादक : रामभाऊ भोयर
इंदिरा गांधी महाविद्यालय राळेगाव येथे राष्ट्रीय शिक्षण धोरण कार्यशाळा सुरू आहे,आज दिनांक 19 फेब्रुवारी ला कार्यशाळा सुरू होण्याअगोदर जिल्हा सुलभक वसंत लोढे सर व सोनाली काळे मैडम यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन माल्यार्पन केले, त्यानंतर प्रशिक्षणाला सुरुवात झाली.
लोढे सरांनी HPC4 वर तासिका घेताना समग्र प्रगतिपत्रक पायाभूत स्तर व मूल्यांकनाचे रुब्रिक समजावून सांगितले त्याच प्रमाणे सोनाली मैडम यांनी क्षमता आधारित मूल्यांकन व संकल्पना समजावून सांगितल्या, मूल्यांकन म्हणजे काय ? मूल्यांकनाचा दृष्टिकोन व हेतू विशद केला.यावेळी सर्व सुलभक देवकते सर,केवटे मैडम,चिरडे सर, बेलसरे मैडम, धामंदे मैडम वयेवले मैडम हजर होते.
