
प्रमोद जुमडे/हिंगणघाट
हिंगणघाट । हिंगनघाट स्टेशनवर 22109/22110 बल्लारशाह-लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई सुपरफास्ट ट्रेनचे आगमन होताच लोकोपायलट व गार्ड यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. वर्धा-बल्लारशाह यात्री संघाचे अशोक सोरटे, चंद्रशेखर खापरे, संघाचे अध्यक्ष राजेश अ. कोचर यांनी त्यांचे स्वागत केले.
हिंगणघाटवासी यांना बहुप्रतीक्षित असलेली लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई-बल्लारशाह ही सुपरफास्ट साप्ताहिक एक्सप्रेस मंगळवार (ता.12 ) मार्चपासून सेवेत सुरू झाली आहे. सदर गाडी दर मंगळवारला गाडी क्रमांक 22109 मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस येथून निघेल तर दर बुधवारला गाडी क्रमांक 22110 बल्लारशावरून निघेल. मंगळवार 12 मार्च रोजी ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनल मुंबई या रेल्वे स्थानकावरून रात्री 9.45 वाजता निघेल व बल्लारशाह बुधवारला दुपारी 12.10 वाजता पोहोचेल. बुधवारी दुपारी 1.40 वाजता ही गाडी बल्लारशाह रेल्वे स्थानकावरून निघेल. दुसऱ्या दिवशी गुरूवारला पहाटे 5.30 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई रेल्वे स्थानकावर पोहोचेल. या लोकमान्य टिळक टर्मिनस बल्लारशाह साप्ताहिक एक्सप्रेसला ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक, भुसावळ, मलकापूर, अकोला, बडनेरा, धामणगाव, पुलगाव, वर्धा, हिंगणघाट, वरोरा आणि चंद्रपूर येथे थांबे देण्यात आले आहे. वर्धा-बल्लारशाह यात्री संघाने बल्लारशाह-मुंबई रेल्वे गाडी शुरू करावी. याकरिता अनेकदा रेल्वे मंत्री व रेल्वे प्रशासनाकडे निवेदने दिली होती. तसेच खासदार रामदास तडस व आमदार समीर कुणावार यांच्याकडे सुद्धा सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर प्रयत्नांना यश मिळाले आहे. सदर गाडी थांबा मिळाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, खा. रामदास तडस, आ. समीर कुणावार यांचे वर्धा-बल्लारशाहा यात्री संघाने आभार मानले आहे. मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांची संख्या पाहता सदर गाडी नियमित करण्यात यावी अशी प्रवाशांची मागणी आहे. परंतु आता बल्लारशाह वरून थेट मुंबई करीता ही नवीन गाडी सुरू झाल्याने प्रवाशांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी ही नवीन गाडी सर्व दिवशी धावणे आवश्यक आहे. प्रवाशांच्या समस्या लक्षात घेऊन या ट्रेनचा विशेष दर्जा काढून घेतला आहे. आता ही ट्रेन नव्या क्रमांकाने धावत असून, आता या ट्रेनच्या भाड्यातही 30 टक्के कपात करण्यात आली आहे, त्यामुळे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
यावेळी वर्धा-बल्लारशाह यात्री संघाचे अध्यक्ष राजेश कोचर, सचिव डी.के. गुरनुले, बाबुसिंग गहेरवार, दिलीप बालपांडे, मो. शहजाद, अशोक सोरटे, चंद्रशेखर खापरे, तपेश चंदाराणा, प्रकाश मिश्रा आर.पी.एफ., गणेश जोशी, संजय खत्री, रवि जुमडे, हरिष सिंघवी, कौसर अंजुम शेख, सौ. नालिनी सयाम, विनोद पोतदार, राष्ट्रपाल कांबळे, रूषीकेश सिंघवी, उमेश चन्नेकर, सौ. चंदाताई बालपांडे, शरद ढोक, चेतन सोनेकर, किशोर सोनटक्के आदि मान्यवर उपस्थित होते.
