लोकेश दिवे मित्रपरिवार तर्फे वर्षवास समाप्ती निमित्त महिलांना भगवान बुद्ध वंदना पुस्तक भेट

चिखली बुद्धविहार येथे वर्षवास महिन्यानिमित्त गेल्या 3 महिन्यापासून रोज ग्रंथापाठ वाचन सुरु होते,मागच्या वर्षी च्या तुलनेत या वर्षी महिलांची संख्या खुप प्रमाणात वाढली असून, मागच्या वर्षी लोकेश दिवे मित्रपरिवार तर्फे महिलांना भगवान गौतमबुद्ध यांची फोटो प्रतिमा भेट देऊन महिलांचा सत्कार करण्यात आला होता,दरवर्षीप्रमाणे चिखली ग्रामपंचायत चे कार्यक्षम सदस्य लोकेश दिवे मित्रपरिवार तर्फे 40 ते 50 महिलांना भगवान बुद्ध यांच्या वंदनेचे पुस्तक भेट देऊन 40 ते 50 महिलांचा सन्मान व सत्कार करण्यात आला, लोकेश दिवे मित्रपरिवार चिखली गावात नेहमी सामाजिक उपक्रमाचे आयोजन करतात,अश्या गावात होणाऱ्या उपक्रमाचे गावातील महिला व नागरिक लोकेश दिवे यांचे कौतुक करत आहे व गावात आनंदाचे वातावरण तयार झाले असून असेच स्तुत्य उपक्रम भविष्यात करत राहा असे जनतेमधून व्यक्त होत आहे आणि असेच सामाजिक कार्य अविरत सुरु राहील असे लोकेश दिवे मित्रपरिवार तर्फे सांगण्यात आले.