
सहसंपादक : रामभाऊ भोयर
शहरातील स्व. राजीव गांधी क्रीडा संकुल येथे नवोदय क्रीडा मंडळाच्या वतीने २९ ऑगस्ट ला हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय क्रीडा दीन साजरा करण्यात आला यावेळी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व मान्यवरांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. यावेळी कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून माजी प्राचार्य सुरेंद्र ताटे, प्रमुख पाहुणे निस्टकर, सागर जुमनाके किशोर उइके नरेश दुर्गे, महेश र राजकोल्हे, अंकित क्षीरसागर हे उपस्थीत होते. कार्यक्रमांचे अध्यक्ष माजी प्राचार्य सुरेंद्र ताटे यांनी खेळाडूंना खेळाचे महत्व समजून सांगितले व सोबतच अभ्यासाचे महत्त्व सुध्दा सांगितले खेळायला मैदानावर चार तास दीले तरीही अभ्यासाला खुप वेळ शिल्लक राहतो त्यामुळे खेळा सोबतच अभ्यासही करा तेव्हाच तुम्हाला खेळाचा फायदा होईल असे खेळाडूंना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे आयोजन नवोदय क्रीडा मंडळ यांच्या वतीने करण्यात आले होते.
