शिवसंपर्क अभियान अंतर्गत मुकुटबन गावात सभेचे आयोजन,सभेला युवकांची विशेष उपस्थिती

प्रतिनिधी:शेखर पिंपळशेंडे,वणी

युवासेनेच्या शिव संपर्क अभियान अंतर्गत गाव तेथे युवा सेना व गाव तेथे शाखा हे बिद्र वाक्य लक्षात घेऊन झरी तालुक्यातील कृ.उ.बा.समिती मुकुटबन येथे बैठक पार पडली.युवा सेनेचे सचिव श्री.वरुण सरदेसाई साहेब, कार्यकरणी सदस्य युवा सेना श्री.रुपेश दादा कदम यांच्या आदेशाने बैठकीचे आयोजन करण्यात आले. शिवसेना जिल्हाप्रमुख विश्वास भाऊ नांदेकर यांचा मार्गदर्शनात या बैठक चे आयोजन केले. सदर बैठकीत युवा सेना जिल्हा प्रमुख श्री.विक्रांत जी चचडा यांनी युवा सेनाच्या पदाधिकारिंना व कार्यकर्ताना मार्गदर्शन करुन प्रत्येक गावात युवा सेना बळकट करणयचे आवाहन केले. तसेच गाव तेथे शाखा हे अभियान गाव गावी राबवावी असे कार्यकर्तांना सुचविले. आणी शिवसेना तालुका प्रमुख श्री. चंद्रकांत घुगुल यांनी युवा सेने सोबत खंबीरपणे उभे राहीन असे त्यानी बैठकीत जाहीर केले. या कार्यक्रमाची प्रस्तावना युवा सेना तालुका संघटक निलेश बेलेकार यांनी केली व त्यावेळी युवा सेना तालुका प्रमुख पवन राऊत प्रसिद्धी प्रमुख प्रमोद गालेवार उप तालुका प्रमुख मनिष भोयर विभाग प्रमुख चेतन बासेट्टीवार अनिल डेगरवार राहुल राजुरकार मंगेश मोहितकर निखिल ठाकरे पंकज पानघाटे सचिन कोठारी वैभव मेश्राम निखिल निखाडे सुरज केळझरकर भुषण आस्वले शंकर मोहीतकार गणेश पोले स्वप्नील आगिरकर सौरभ मंडळवार सागर आवारी कुणाल टेकाम शेख आमिर शेख उस्मान नितीन मासिरकार दशरथ रामडवार सुरज मासीरकार शशिकांत क्षीरसागर अविनाश मांढरे सचिन विशाल टोंगे प्रशिक बरडे उपस्थिती होते.