
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील जागजई या गावाला जाण्यासाठी आणि राळेगावला येण्यासाठी पुरेशी व्यवस्था नसल्याने लोकांना मिळेल त्या वाहनाने प्रवास करावा लागतो.अशातच दिनांक 19/8/2025 रोजी प्रवासी प्रवास करतांना उंदरी ते रामतीर्थ दरम्यान अँटो पलटी होऊन त्यात प्रवास करणरे प्रवासी लता विष्णू करपते व तुळशीराम संभाजी भरणे हे गंभीर जखमी झाले त्यापैकी एकाला सावंगी मेघे येथे तर दुसऱ्याला नागपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले या घटनेची माहिती मिळताच नुकताच विधानसभा निवडणुक लढलेले आणि पराभूत झालेले तरी पण मतदारसंघावर आजही तेवढेच लक्ष केंद्रित असलेले वरीष्ठ पोलिस अधिकारी अशोक मेश्राम तसेच सामाजिक कार्यकर्ते मुन्ना सैय्यद यांनी तातडीने दहा हजार रुपयाची मदत पाठवून जखमींना दिलासा दिला आहे.अशातच मतदार संघात सक्रिय असलेले नेते, कार्यकर्ते यांची मात्र गैरहजेरी निश्चितच जखमींच्या मनला चटका लावून गेली. ज्यांना आपण आपलं समजून आपलं अतुल्य मत दिलं त्यांचा कुठेही थांगपत्ता लागत नाही तर मतदार संघात पराभूत झाल्यानंतरही ज्यांनी मदत केली त्यांच्याबद्दल राळेगाव तालुक्यात खरोखरच तो उमेदवार अशी चर्चा सुरू आहे.
