युवासेना उपजिल्हाप्रमुख अजिंक्य शेंडे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा

युवकांचे आधारस्तंभ, युवासेनेचे धडाकेबाज म्हणून ओळखले जाणारे कट्टर शिवसैनिक उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवत साजरा करण्यात आला.
मंगळवारी सकाळी ग्रामीण रुग्णालयात फळ आणि बेडशिट वाटप, आनंद बाल सदन येथे फळ आणि ब्लँकेट वाटप,
अपंग शाळेमध्ये फळ आणि बेडशिट तसेच ब्लँकेट वाटत तर
बाजीराव महाराज वृद्धाश्रम येथे फळ आणि धान्य वाटप करण्यात आले.
अजिंक्य शेंडे हे यापूर्वी कोरोना काळात अनेक गरजू रुग्णांसाठी धाऊन आले होते. त्यावेळी त्यांनी अनेक रुग्णांना आक्षीजन पुरवठा करुन अनेकांचे प्राण वाचवुन मदत केली होती हे विशेष…
यावेळी दिपांकर वनकर,विक्रम कुलकर्णी,कपील कुंटलवार,सागर मेश्राम, प्रविण मांडवकर, अनिकेत मडावी, शिवराम चिडे , गणेश पेटकर, किशोर ठाकरे, प्रफुल्ल बोरडे,चेतन उलमाले,अंकेश्वर बोंडे, क्रिंश सिडाम,आदीत्य सातपुते, दिनेश बोधे, अनिकेत बदखल, लोकेश मेश्राम, रितेश गुगल यांच्या सह अजिंक्य शेंडे मित्र परिवार उपस्थित होते.