
सहसंपादक: रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील ग्रामपंचायत अंतर्गत राबविण्यात येणा-या ई निविदा या शासकीय नियमाप्रमाणे राबविल्या जात नसून सदर ई निविदा लावतांना ग्रामअधिकारी हे आपल्या मर्जी प्रमाणे ई निविदामध्ये नियम व अटी टाकतांना आढळून येत आहे . भविष्यात ई निविदा लावतांना केवळ शासकीय नियमाप्रमाणे अटी-शर्ती टाकण्यात येवून ई निविदा राबविण्यात यावा अशा आशयाचे निवेदन यवतमाळ जिल्हा कंत्राटदार कल्याण संघटना यवतमाळ यांच्यावतीने गटविकास अधिकारी राळेगाव यांना देण्यात आले आहे.
शासन निर्णयानुसार ग्रामपंचायत स्तरावर केवळ तीन लाखापर्यंत ऑफ लाईन व तीन लाखांच्या वरील सर्व निविदा यापुढे ई निविदा प्रक्रिया राबविण्यात यावी तसेच ई निविदा प्रकाशित करतांना आपल्या कार्यालयातील कर्मचा-यामार्फत प्रकाशित करण्यात याव्यात कारण आतापर्यंतच्या ई निविदा बाहेरील व्यक्तीकडून ग्रामपंचायत अंतर्गत राबविण्यात येत आहे. तरी यापुढे वरील सर्व ई निविदा शासकीय नियमानुसार लावण्याचे आदेश आपल्या स्तरावरून सर्व ग्रामपंचायत कार्यालयास देण्यात यावेत अन्यथा अशा प्रकारच्या ई-निविदा प्रकाशित न झाल्यास संघटनेला आंदोलनात्मक भुमिका घ्यावी लागेल, अथवा न्यायालयात दाद मागण्यात येईल अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली असून निवेदन देतेवेळी यवतमाळ जिल्हा कंत्राट कल्याण संघटनेचे अध्यक्ष प्रवीण उंबरकर सचिव अमित उत्तरवार कोषाध्यक्ष रुपेश गुल्हणे, इंजि.राजू दुधपोळे, इंजि.सुधाकर गेडाम,
इंजि.आकाश ताठे , इंजि. ओम डाखोरे,इंजि.सुमीत डाखोरे, इंजि. मंथन ठुणे,इंजि. विशाल गवारकर, इंजि. राहुल पाटील आदी इंजि उपस्थित होते
