
सहसंपादक : रामभाऊ भोयर
यवतमाळ येथून विस किलोमीटर अंतरावरील तिवसा येथील स्व. राजीव गांधी विद्यालयात दिनांक 23 सप्टेंबर 2025 रोजी रमण विज्ञान केंद्राच्या स्वास्थ सुरक्षा बसचे उद्घाटन करण्यात आले.त्यावेळी यवतमाळ जिल्हा माध्यमिक शिक्षण अधिकारी रविंद्र काटोलकर उपशिक्षणाधिकारी प्रदीप गोडे विज्ञान पर्यवेक्षक तथा निरिक्षक कनिष्ठ महाविद्यालय यवतमाळ योगेश डाफ संस्थेच्या अध्यक्षा कुमारी रेणूताई वामनराव राठोड सचिव विनोद नाईक हे प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी स्व.मंगलाताई सतर्क सार्वजनिक वाचनालय लक्ष्मी नगर यवतमाळ या संस्थेद्वारे महाराष्ट्र राज्य वाचन चळवळ वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीने वाचनालय शाळेत या उक्तीचा अनुभव आज शाळेत आला. शिक्षणाधिकारी काटोलकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुस्तके वाचन साहित्य देऊन महाराष्ट्रातील चळवळीचा शुभारंभ करण्यात आला.हा उपक्रम विविध शाळांमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहचावा या हेतूने प्रकल्प राबविण्याचा मानस स्व मंगलाताई सतर्क वाचनालयाचे प्रमुख प्रशांत पंचभाई यांनी राबविण्याचा संकल्प केला आहे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेची विद्यार्थिनी कुमारी रोशनी राठोड हिने केले तर प्रास्ताविक जेष्ठ शिक्षक प्रशांत पंचभाई सर यांनी केले तर आभार प्रदर्शन विद्यार्थ्यांनी कुमारी कोमल राठोड हिने केले. याप्रसंगी स्व. राजीव गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेश जाधव सहायक शिक्षक जनबंधू सर, नंदकिशोर गुल्हाणे सर, अशोक चारमोडे सर विशाल काळे सर राहुल करपते सर, यशवंत नाईक सर सौ कंधारे मॅडम व इतर मान्यवर उपस्थित होते.
