
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगांव येथे जुने मातानगर होते त्याच्याच बाजूला काही अंतरावर सन २०१८-२०१९ मध्ये महेश लडके रा. वर्धा या ले-आऊट मालकाने जमीन खरेदी करून प्रभाग क्रमांक सहा येथे लेआऊट पाडून या ले आऊट चे नावं ‘न्यु मातानगर राळेगांव म्हणून ठेवण्यात आले परंतु या न्यू मातानगर मध्ये अद्यापही सोयी सुविधा उपलब्ध करून करुन न देता सर्रास प्लॉट विक्री केले, त्या वेळी काही दिवसांत संपूर्ण सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल असे तोंडी आश्वासन दिले होते तेव्हा आतातरी ले आऊट मालकांनी पंधरा दिवसात सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्या अन्यथा प्लॉटधारकांनी उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. प्लाटधारकांनी या ले आऊट खरेदी करतांना ले आऊट मालकांनी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल असे सांगितले होते परंतु पाच वर्षात काही चं केले नसल्याने दिसून येत आहे
या संदर्भात प्लॉट धारकांनी ले आऊट मालकाला वेळोवेळी सुचनाही केल्यात, पण दुर्लक्ष केले आहे.
या ले आऊट मध्ये रस्ता,
नाल्यां, नाही, सर्वत्र गाजर गवताचे, काटेरी झाडे, संपूर्ण ले आऊट मध्ये तलाव सदृश्य परिस्थिती आहे.
ले आऊट मध्ये कोणत्याही सोयी सुविधा उपलब्ध नसताना नगर पंचायत राळेगांव ने या ले आऊट मालकास नाहरकत प्रमाणपत्र दिले चं कसं? हा ही एक संशोधनाचा विषय आहे.
सदर ले आऊट मध्ये पाणी पाणी साचून असल्याने आजुबाजुच्या परिसरात दुर्गंधी, डासांच्या प्रमाणात वाढ होत आहे, नागरिकांच्या आरोग्याचा विचार करुन नगर पंचायत राळेगांव ने या ले आऊट मालकावर कडक कारवाई करावी, संपूर्ण सोयी सुविधा उपलब्ध करुन प्लॉट धारकांना दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात येत आहे.
पंधरा दिवसात या मागण्या पूर्ण न केल्यास आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा संबंधित प्लॉट धारकाकडून प्रशासनास दिलेला आहे…
