
सहसंपादक : रामभाऊ भोयर
*
राळेगाव विधानसभा मतदार संघाला ना. प्रा. डॉ. अशोक उईके यांच्या रूपाने कॅबिनेट मंत्री पद मिळाले. आदिवासी विकास या हेवीवेट खात्यावर त्यांची वर्णी लागली. आज ( दि. 4 जाने.) मंत्री पदावर निवडी नंतर प्रथम आगमनानिमित्त राळेगाव शहरात त्यांचा जंगी सत्कार उत्साहात पार पडला.साई सेवाश्रम मित्र परिवार चे वतीने क्रांती चौक राळेगाव येथे त्यांचा सत्कार करण्यात आला. विठ्ठल -रखुमाई ची सुंदर मूर्ती देऊन त्यांचा प्रथम आगमना निमित्त सत्कार करण्यात आला. फुलांची उधळण, बँडचा उत्साह व घोषणाचा उदघोष यांनी आसमंत दणाणून सोडला. कार्यकर्त्यांनी जल्लोषात त्यांचे स्वागत केले या क्षणी बाळू धुमाळ विनयभाऊ मुनोत गिरिधर ससणकर मंगेशराऊत विरेंद्र व्हारेकर गजानन काळे निलय घिनमीने अक्रम पठाण स्वप्नील धनालकोटवार अजगरअली सैय्यद दिनेश करपते शुभम तोटे आकश राऊत अजय लोहे
अजय धतकर महादेव लांबाडे यांची उपस्थिती होती.
