
सहसंपादक: रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील दहेगाव येथील दोन वर्षांपूर्वी राळेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा आदिवासी विकास मंत्री प्रा डॉ ना अशोक ऊईके यांच्याकडे दहेगाव येथील आदिवासी समाजाच्या नागरिकानी सभागृहांची मागणी केली होती तेव्हा त्यांनी त्यांच्या मागणीची दखल घेऊन आमदार फंडातून सभागृह मंजुर करून दिले व त्यांच्या कंत्राट सुद्धा देण्यात आला परंतु संबंधित कंत्राटदार काम सुरू करत नव्हता तेव्हा दहेगाव येथील आदिवासी नागरिक संबंधित कार्यालयात काम सुरू करण्याची मागणी करत होते असे करता दोन वर्ष निघून गेले व डिसेंबर २०२३ ला कामाची सुरवात केली पण आता जानेवारी २०२५सुरू आहे व दुसरे वर्ष सुरू झाले पण काम अजून फक्त तीन फूट भिंत झाली आहे बाकी सभागृहाचे पुर्ण बांधकामा ला किती वर्ष लागतील अशे दहेगाव येथील आदिवासी बांधवांमध्ये बोले जात आहे तेव्हा अश्या हलगर्जी बेजबादार ठेकेदारांवर कारवाई करावी व संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग राळेगावने लक्ष देऊन सभागृहांचे बांधकाम पूर्ण करावे अशी मागणी दहेगाव येथील आदिवासी बांधव करित आहे
