राळेगाव तालुक्यातील सहा ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक व दोन ग्राम पंचायतीच्या पोट निवडणुकीचा निकाल जाहीर

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यातील सहा ग्राम पंचायतीच्या सार्वत्रिक व दोन ग्रामपंचायतीची पोट निवडणूक दिं ५ नोव्हेंबरला पार पडला असून दिं ६ नोव्हेंबर २०२३ रोज सोमवारला निकाल जाहीर झाला असून सहा ग्रामपंचायती पैकी वरध, सावरखेडा, लोणी, सराटी, जळका या पाच ग्रामपंचायतीवर काँग्रेसने वर्चस्व मिळविले तर सखी या एका ग्रामपंचायतीवर भाजपाने वर्चस्व मिळविले आहे.
या सहा ग्रामपंचायती निवडणून आलेल्या सरपंच व सदस्यांची नावे ग्रामपंचायत जळका सरपंच पदी सुशीला रमेश कुमरे, सदस्य म्हणून मनोज चंपत पवार, सुमन विश्वास लोणकर,दिपाली लक्ष्मण कोळसे, संजय बाबाराव पांडे, राधा मुरलीधर येडस्कर, नमिता रमेश पाल, अनिल हिरामण वनकर, निलेश दिलीप हिवरकर, लक्ष्मी गणेश कुंमरे, तर ग्रामपंचायत वरध सरपंच पदी निलेश दौलत रोठे, सदस्य रतन राहुल मांगुर्ले, ज्ञानेश्वर नरहरी डोफे, निर्मला दौलत रोटे, रीना नंदपाल येसंबरे, निर्मला शिवाजी टेकाम, संतोष अण्णाजी महाजन, शशिकला श्रीकृष्ण खंगारे तर निर्मला शिवाजी टेकाम ह्या अविरोध निवडून आल्या तर ग्रामपंचायत लोणी सरपंच अविरोध, वर्षा कैलास भुरकुटे सदस्य म्हणून रवींद्र किसान शिडाम , गणेश हरकचंद नगराळे,बाबा नारायण उईके तर अविरोध म्हणून सीमा मिथुन राऊत प्रभावती भास्कर शिडाम सुजाता रामकृष्ण आत्राम सुवर्णा हिराचंद लढे तर ग्रामपंचायत सराटी सरपंच पदी संतोष दमडू आत्राम सदस्य म्हणून आकाश महादेव पवार ,उज्वला रामाजी आत्राम, नम्रता लक्ष्मण ठाकरे, लता नारायण सोयाम, अशोक नारायण कोवे, गंगा गुलाब राऊत, कडू शामराव येलके तर ग्रामपंचायत सावरखेडा सरपंच पदी राजेश्वर नारायण मेश्राम सदस्यपदी मंगेश मारोती आत्राम, कपिल हरिभाऊ चौधरी, अविरोध निवडून आलेले सदस्य प्रियंका अमोल राऊत, मोतीबाबा नथुजी पोराते , आशा विनायक परचाके, कांचन प्रवीण झाडे तर एक पद रिक्त आहे तिथे कोणीही अर्ज दाखल केला नाही तर ग्रामपंचायत सखी ही ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात गेली असून सरपंच पदी भीमराव पोलाजी पुरके सदस्य अभिमान धर्मा मसराम, गजानन अजाब कोहळे, वर्षा सुरेश दडांजे, शोभा अविनाश कोहळे, गोवर्धन शंकर उईके, सुवर्णा चरणदास दूधकोहळे अविरोध निवडून आले सदस्य ममता कैलास कोवे निवडून आले असून तालुक्यातील दहेगाव व चोंडी इथे एक एक पदाकरिता पोटनिवडणूक घेण्यात आली दहेगाव येथे देवानंद नंदलाल काळे चोंडी येथे लक्ष्मी महेंद्र कुंभेकर या पोटनिवडणुकीत विजयी झाल्या, निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार अमित भोईटे यांनी जबाबदारी सांभाळली सकाळपासूनच कार्यकर्त्यांची तहसील कार्यालयासमोर गर्दी उसळली होती आपल्या गावचा निकाल लागताच कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून आनंद साजरा केला राळेगावचे ठाणेदार रामकृष्ण जाधव यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता पंचायत समितीचे माजी काँग्रेसचे उप सभापती निलेश दौलतराव रोठे यांनी ग्राम पंचायत वरध सरपंच पदाची निवडणूक लढविली ते या निवडणुकीत विजयी झाले हे विशेष त्यांनी या आधी पंचायत समिती राळेगाव येथे उपसभापतीची धुरा सांभाळली होती नुकत्याच संपन्न झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे सहापैकी पाच ठिकाणी सरपंच झाल्यामुळे व पाच ग्रामपंचायतींमध्ये काँग्रेसचे वर्चस्व मिळाल्यामुळे काँग्रेसकडून सर्व सदस्यांचे अभिनंदन करण्यात आले हा सर्वसामान्य विजय असल्याचे मत तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र तेलंगे यांनी सांगितले आहे.