
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील कारेगाव हे गाव वर्धा नदीच्या तिरावर असल्याने दरवर्षी या गावात वर्धा नदीच्या पुराचे पाणी शिरुन अनेक ग्रामस्थांचे घर संसाराच्या सामानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते असते .ऐवढेच नव्हें तर कारेगाव गावाला सभोताल पाण्याच्या वेढा पडल्या जाते तेव्हा मात्र कारेगाव येथील ग्रामस्थांचे सुरक्षेतेच्या दृष्टीने वडकी येथे भवन मध्ये स्थलांतरित केले जाते.पण कधीकधी रात्रीच्यावेळी वर्धा नदीच्या पुराचे पाणी हे गावात शिरले की मात्र मग कारेगाव येथील ग्रामस्थांचे जिवाची सुरक्षा घेतल्याशिवाय पर्याय नसतो . याकरीता अनेकवेळा कारेगाव येथील ग्रामस्थांनी प्रशासकीय अधिकारी तसेच खासदार, आमदार यांना या पुनर्वसनाबाबत सांगितले तरी पण आतापर्यंत पुनर्वसन झाले नाही.समोर ऐक महिन्यात पावसाळा सुरू होणार असल्याने पुन्हा कारेगाव गावावर तीच परिस्थिती उद्भवली जाणार नाही या कारणामुळे कारेगाव येथील पंढरी कोडापे, आनंदराव ऐकोनकर, उत्तमराव तिवाडे, नारायण वडुले , राजेश्वर नंदुरकर,उरकुडा जुनगरे, विलास बोरेकर, विमलताई नंदूरकर, सखुबाई देवतळे,कौसल्याबाई चरडे,गुंभा बचाटे, सुलोचना जोगी, कमलाबाई बोरेकर, वर्षाताई बोरेकर,ज्योती बोरेकर, मधुकर पिटाले,कुंडलीक शिरसागर, भावराव बरडे, या महिला व पुरुष मंडळी यांनी शेवटी राळेगाव येथे जाऊन सुधीर पाटील उपविभागीय अधिकारी राळेगाव व अमित भोईटे तहसीलदार राळेगाव याची भेट घेऊन आमच्या कारेगाव गावाचे तातडीने पुनर्वसन करुन आम्हाला सुरक्षेतीची जागा द्यावी याकरीता विनंती केली.
