

उमरखेड तालुका प्रतिनिधी :विलास तुळशीराम राठोड (ग्रामीण )
उमरखेड तालूका अंतर्गत येणारे पोफाळी परिसरात काल दिनांक 18 मार्च 2023 रोजी उमरखेड तालुक्यामधील पोफळी सर्कल आणि तसेच निंगनूर, मेट,ढाणकी,खरूस,टेंबूरदरा,वाडी,गोविंदपूर ,कृष्णापूर इतरअनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गारपीट झाली . या गारपीटीमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आणि शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळावी म्हणून ओरड सुरू झाली होती .तसेच शासनाला सोशल मीडिया आणि वर्तमानपत्रातून खरी परिस्थिती कळविण्यात आली होती . त्याचाच परिणाम म्हणून उमरखेडचे तहसीलदार श्री देऊळगावकर साहेब यांनी तातडीची संबंधित कर्मचाऱ्यांची बैठक बोलावून कोणत्याही परिस्थितीमध्ये तात्काळ नुकसानीचा पंचनामा करण्याचे आदेश दिले .पंचनाम्यावर जुनी पेन्शन आंदोलनाचा कोणताही परिणाम होणार नाही असे त्यांनी पुढे म्हटले आहे आणि आठ दिवसाच्या आत सर्व पंचनामे पूर्ण होऊन अहवाल शासनाला देण्यात येणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करू नये असे आव्हान त्याने पुढे केले आहे.
