आंदोलनामध्ये जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे
-डॉ. अरविंद कुळमेथे
सहसंपादक : रामभाऊ भोयर
दिनांक 16 जुलै रोजी कळंब येथे तहसील कार्यालयावर बिरसा ब्रिगेड च्या वतीने शेतकरी, शेतमजूर ,बेरोजगार युवक व महिलांच्या हक्क अधिकारासाठी व मागण्यासाठी बिरसा ब्रिगेड च्या वतीने डॉ.अरविंद कुळमेथे यांच्या नेतृत्वात एक दिवसीय लाक्षणिक आंदोलन सकाळी ११ वाजता पासून ते दुपारी ५ वाजेपर्यंत आयोजित केलेले आहे.
या आंदोलनामध्ये प्रामुख्याने
मागील वर्षापासून शेतकऱ्यांना पिक विमा मिळाला नाही तरी तो तात्काळ देण्यात यावा,
शेतकऱ्यांची कर्ज माफी करावी,
शेतकऱ्यांना बँकेचे कर्ज,क्रॉप लोन तात्काळ देण्यात यावे, पाउसा मुळे शेतकर्यांचे बियाणाचे झालेले नुकसान झाल्यामुळे ते सर्वे करून शासनाने शेतकऱ्यांना नुकसन भरपाई देण्यात यावी,
बेंबळा प्रकल्प कालव्याची पुनर्रचना करून बेंबळा प्रकल्पाचे पाणी शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात यावे,
MIDC कळंब मध्ये सुरू करावी,
विद्यार्थांसाठी ग्रंथालय,वाचनालय,क्रीडांगण, व्यायाम शाळा निमार्ण करून द्याव्या,आदिवासी गावांना पेसा मध्ये समाविष्ट करावेत, अतिक्रमण धारक शेतकऱ्यांना जमिनीचे पट्टे तत्काळ देऊन त्यांना त्यांचा ७/१२ नावी करून द्यावा, कळंब ते वडकी या रोडवर दोन टोल नाके कार्यरत आहेत ते टोल नाके तात्काळ बंद करण्यात यावे. इत्यादी मागण्यासाठी हे एकदिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन आयोजित केले आहे तरी समस्त जनतेने या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन बिरसा ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष डॉ.अरविंद कुळमेथे, महाराष्ट्र प्रदेश संघटक प्रा. वसंत कनाके, सुरज मरस्कोल्हे, विनोद उईके, जगदीश मडावी, प्रमोद इरपाते, उमेश येरमे, गणेश शिंदे, महादेव मेश्राम ,दिनेश करपते, योगेश अरके, महेश सोयाम, रोशन घोडाम,कुंदन कुमरे, अजबराव कोरांगे, गजानन वरकडे, सुनील धुर्वे, निवृत्ती पंधरे, अमोल येटी, सुमित आत्राम,सुनील मेश्राम,गजानन टेकाम,पवन वड्डे,नितीन मडावी,समीर वडे, धनराज गेडाम,अजय कन्नाके, श्रीराम पंधरे, किशोर कंगाले, संजय वेटी, गजू उईके, बादल जुमनाके, मनीष गेडाम, अविनाश कुळसंगे, विठ्ठल कनाके, नाना कन्नाके, दिनेश मडावी, संजय घोडाम, गजानन तलांडे, नितीन कोंकडे, ,दिनेश केरम, गजू गेडाम, आशिष उईके,गणेश घोडाम, रतन टेकाम रवी मडावी, प्रमोद टेकाम मंगेश सरडे,अजय किनाके, अजय मेश्राम, रामचंद्र मडावी, अंकुश उईके, नामदेव आत्राम, जीवन पेंदाम, रविकांत उईके, शुभम पंधरे, नकुल बोडेकर, किशोर कोवे, रवी टेकाम, मारुती मरापे, गौरव मडावी, सुनील किनाके, प्रशांत घोडाम,देविदास परचाके, संजय आत्राम,गजानन कुडमेथे,संदीप मडावी, अमर उईके, संजय आत्राम, शंकर जुंगरे,विद्या परचाके ,माधुरीताई अंजीकर ,प्रतिभाताई ईवनाते, मनोरमा पंधरे, सुलचना कोंकडे,आदींनी केले आहे.
