
सहसंपादक : रामभाऊ भोयर
इंदिरा महाविद्यालय आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ मराठी प्राध्यापक परिषदेच्या संयुक्त विद्यमाने 22 ते 24 मार्च दरम्यान मध्य प्रदेशातील कान्हा व्याघ्र प्रकल्पात आयोजित राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन सेवानिवृत्त प्राचार्य, वाणिज्य शाखेचे गाढे अभ्यासक डॉ. प्रकाश सोमलकर यांच्या हस्ते होणार आहे. बीजभाषक म्हणून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे माजी व्यवस्थापन परिषद, अधिसभा व अभ्यास मंडळ सदस्य डॉ. प्रफुल्ल गवई, तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. चंदू पाखरे, डॉ. गजानन मुंधे, डॉ. पांडुरंग जाधव, प्रा. भावना तायडे उपस्थित राहणार आहेत.
परिषदेचा विषय ‘इंटरसेक्शन ऑफ न्यू डिसिप्लिन्स, इनोव्हेटिव्ह रिसर्च अँड ॲक्शन्स’ – ‘इंदिरा 2026’ असा असून त्रिदिवसीय विविध सत्रांमध्ये सखोल विचारमंथन होणार असून देशभरातील प्राध्यापक, संशोधक व विद्यार्थी सहभागी होणार आहेत. जवळपास 30 संशोधकांना आपले शोधनिबंध सादर करण्याची संधी या निमित्ताने मिळणार आहे.
उद्घाटन सत्र 22 मार्च रोजी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ मराठी प्राध्यापक परिषदेचे अध्यक्ष व इंदिरा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पवन मांडवकर यांच्या अध्यक्षतेखाली तर 24 मार्च रोजी समारोपीय कार्यक्रम उपप्राचार्य प्रा. सरोज लखदिवे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.
संस्था उपाध्यक्ष डॉ. वीरा मांडवकर व प्रा. निळकंठ नरुले यांच्या मार्गदर्शनात परिषदेच्या यशस्वीतेसाठी डॉ. माधुरी राखुंडे, डॉ. शीतल राऊत, डॉ. सुरज देशमुख, प्रा. राहुल सिन्हा, डॉ. शरयू बोंडे, प्रा. सखाराम सांगळे, प्रा. जवाहर बोदुलवार, प्रा. रूपेश आत्राम, प्रा. विकी वाटकर, डॉ. प्राची बोंडे हे झटत आहेत.
