ज्ञान सूर्याला राळेगावकरांची मानवंदना

डोळ्यातून वाहणाऱ्या आसवांना मुभा आहे कारण बाबासाहेब तुमच्यामुळे आज आम्ही स्वाभिमानाने उभे आहोत आम्ही घेतो तो श्वास आणि खातो ती भाकरी फक्त आणि फक्त तुमचं देण आहे अशा भावनेतून शेकडो अनुयायाने सकाळपासूनच विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर ६७ व्या महापरिनिर्वाणदिनी अभिवादन केले.
आज दिं. ६ डिसेंबर २०२३ रोज बुधवार ला शहरातील क्रांती चौक येथे सकाळपासूनच पाऊस सूरु झाला असतांना भर पावसाची तमा न बाळगता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा परिसरात अभिवादनासाठी अनुयायांची गर्दी झाली होती धम्मचक्राची तुमच्या वाढू आम्ही गती…. हा तुमचा झेंडा आम्ही घेतलेला सोबती….
भारतीय राज्यघटनेतील शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आपल्यात नाहीत…. मात्र त्यांचे विचार आपल्या पिढ्यांना पिढ्या समृद्ध करणारे आहेत…. ते सदैव जिवंत राहतील मार्ग दाखवत राहतील त्यांच्या विचाराची प्रेरणा ही तळागाळापर्यंत व्हावी त्यांच्या शिकवणीचा अंमल व्हावा हीच खरी त्यांना श्रद्धांजली राहील…. असा संदेश देत शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी विविध समाजातील समाज बांधवांनी अभिवादन केले.
सकाळी ९:०० वाजताच्या दरम्यान शहरातील बौद्ध उपासक उपासीका यांनी पांढरे वस्त्र ग्रहण करून त्रिशरण पंचशील बुद्ध वंदना घेऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले यावेळी शहरातील शेकडो उपासक उपसिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महापरिनिर्वाणदिनी एक वही एक पेन देऊन अभिवादन


वाचनालय बांधून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करा चांगले व्यक्तिमत्त्व होतील हा संदेश डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला आहे यातूनच डॉ बाबासाहेबांचे विचार लोकांपर्यंत पोहोचावे याकरिता महापरिनिर्वाण दिनानिमित्त विद्यार्थ्यांना एक वही एक पेन देण्याकरिता अभिवादना करीता येणाऱ्या मान्यवरांकडून भीम टायगर सेनेच्या महिला तालुका अध्यक्ष दिक्षा नगराळे यांच्या कडे वह्या व पेन उपलब्ध करून देण्यात आले आहे.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त एक वही एक पेन हा उपक्रम राबवित विद्यार्थ्यांना एक पेन व एक वही वाटप करण्यात येणार असून हा उपक्रम राबवित विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये आवड निर्माण व्हावी हे स्वप्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे होते म्हणून एक वही एक पेन हा उपक्रम राबवून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या पावन स्मृतीस अभिवादन केले आहे.