मनसे कार्यकर्त्याचा वाढदिवस केला अनाथ आश्रममध्ये उत्साहात साजरा,मनसे ने जपली सामाजिक बांधिलकी

मनसे पक्षप्रमुख हिंदुजननायक सन्मानिय राजसाहेब ठाकरे आपल्या पदाधिकाऱ्यांना सतत सांगत असतात ऐंशी टक्के समाजकारण आणि विस टक्के राजकारण हेच आपलं राजकारण याचीच प्रचिती आज राजूरा येथे आली मनसेच्या कार्यकर्त्याचा वाढदिवस साजरा करायचा आहे याची माहिती मनसेचे जिल्हासचिव श्री. किशोरभाऊ मडगुलवार यांना देन्यात आली तेव्हा किशोरभाऊ मडगुलवार यांनी राजूरा येथे जाऊन आपल्या पदाधिकाऱ्यांची भेट घेत आपल्या कार्यकर्त्यांच वाढदिवस अनाथ आश्रम येथे साजरा करण्याचे ठरविले आणि मनविसे राजूरा तालुका अध्यक्ष सोनू परचाके यांच्या सोबत मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते घेऊन अनाथ आश्रमात जाऊन तेथील अनाथ मुलांच्या उपस्थिततीत उत्साहाने वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळेस येथील अनाथ बालकांना मिठाई व केक देऊन त्यांच्या छोट्याशा मनावर मायेची ऊब दिली यामूळे येथील मुले देखील आनंदाने न्हाऊन गेली या अनमोल विचाराने मनसे पदाधिकाऱ्याचे सर्वत्र कौतुक होत असून सामाजीक कार्यात सदैव तत्पर असणारे मनसेचे जिल्हा सचिव किशोरभाऊ मडगुलवार यांनी या उपक्रमातून सामाजीक बांधीलकि जोपासली यावेळेसे मनसे जिल्हासचिव किशोर मडगुलवार, ( ॲडव्होकेट विजय भोई साहेब राजूरा)मनविसे राजूरा तालूका अध्यक्ष सोनु परचाके,क्रिष्णा गुप्ता,प्रमोद पुसाम,साहील कन्नाके, नितीन धुर्वे, महेश विधाते , धुर्वे मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते