गळफास घेत इसमाची आत्महत्या


प्रतिनिधी::प्रवीण जोशी
यवतमाळ


पन्नास वर्षीय इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली.
सविस्तर वृत्त असे की रमेश रामचंद्र तिवसकर राहणार ढाणकी वय पन्नास वर्ष हा गेल्या काही दिवसापासून मानसिक तणावात होता. दोन वर्षांपूर्वी पत्नी वारल्याने एकाकी पडलेल्या रमेश ला चांगलाच धक्का बसला होता. त्याला एकाकी जीवन सहन न झाल्याने स्थानिक राम मंदिर परिसरात भिंगरीच्या झाडाला झेंड्याच्या कपड्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. पुढील तपास पोलीस स्टेशन बिटरगाव करीत आहे.