यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
नुकताच 10 वी CBSE बोर्डाचा निकाल जाहीर झाला असून मार्कंडेय पब्लिक स्कूल बरडगाव चा निकाल 100%लागला असून विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट असे यश संपादन केले आहे.दरवर्षी प्रमाणे यंदाही यशाची परंपरा कायम ठेवत विद्यार्थ्यांनी गुण प्राप्त केले आहे. त्यात पारितोष आगलावे 98%,नमन गोधनकर 97%,कु.नीरजा बोन्द्रे 96%,कु. तन्वी कोकरे 95%, कु.आनंदी शिंदे 94%,ज्योतिर्मय सोनेकर 94%,कु.काव्या कचेवार 94%, साई उंबरकर 94%कु. मंजिरी ठाकरे 94%, कु. वंशिका झाडें 93%साईज्योत तेलंगे 93%,वेदांत नान्हे 93% प्राप्त करून यश संपादन केले आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे सचिव डॉ. संतोष कोकुलवार व संस्थेच्या अध्यक्षा तथा प्राचार्या डॉ. शीतल बल्लेवार यांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले. विद्यार्थ्यांनी त्यांच्या यशाचे श्रेय शाळेतील शिक्षक व पालकांना दिले.
