
ढाणकी प्रतिनिधी ( प्रवीण जोशी)
ग्रामीण भागात असलेल्या ढाणकी परिसरातील पंचायत समिती उमरखेड अंतर्गत जिल्हा परिषद च्या बहुतांश शाळा मधील अनेक जलशुद्धीकरण संच बंद अवस्थेत असून ग्रामीण भागातील शाळांना दिलेले जलशुद्धीकरण यंत्र बोगस कंपनीचे असल्याची चर्चा सर्व दूर आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा मधील शासनाकडून बसविण्यात आलेले जलशुद्धीकरण यंत्र मोजक्या ठिकाणी अवघे काही दिवस चालू राहिले व या ठिकाणी नवलाईचे नऊ दिवस यालाच म्हणतात याचा पालकांना प्रत्यय आला.
या बंद असलेल्या यंत्रांना संबंधित शाळा प्रशासनाने तात्पुरती मलमपट्टी केली मात्र काही दिवसातच पुन्हा तोच प्रत्यय येत आहे. परिणामी यंत्रे चालू होत नसून शोभेची वस्तू व कुचकामी ठरत आहे. म्हणून ही यंत्रे बोगस कंपनीची असल्याची जवळपास चर्चा ऐकिवात असून अनेक शाळांनी याबत दबक्या स्वरात नाराजी सुद्धा व्यक्त केली आहे. केवळ कंपनीला जगविण्यासाठी शासनाचा हा उपक्रम होता का? असा प्रश्न सुज्ञ पालकांना पडतो आहे. विशेष बाब अशी म्हणावी लागेल की पिण्याचे शुद्ध पाणी सर्वसामान्य परिस्थिती असलेल्या विद्यार्थ्यांना मिळावे या ध्येयाला कुठेतरी तिलांजली देण्यात येत आहे. असे दिसत आहे. शुद्ध पाणी मिळावे व आरोग्यवर परिणाम होऊ नये म्हणून शासनाने 2008 मध्ये अनेक शाळांना जलशुद्धीकरण यंत्र दिले होते तसेच जलशुद्धीकरण यंत्राची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी एका खाजगी कंपनीकडे दिली होती परंतु संबंधित कंपनी ने पाठ फिरवल्याने ही उठा ठेव कंपनीला जगवण्यासाठी केली होती का? हा प्रश्न पडतो आहे तसेच अनेक जिल्हापरिषद शाळेत असलेले जलशुद्धीकरण यंत्र ही भंगार मध्ये पडून असल्याचे भयान वास्तव आहे. हे नाकारून चालता येणार नाही. याकडे शासनाचा संबंधित विभाग लक्ष देईल का? व हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न सुटेल का? हा मोठा ग्रहण प्रश्नच पडतो आहे ढाणकी व परिसरातील अनेक शाळांमधील ही परिस्थिती आहे तसेच मागील काही वर्षांपूर्वी बसविलेल्या या यंत्राची किंमत जवळपास 70 हजार रुपयांच्या आसपास होती त्यामुळे आज याबाबत विचार न केलेला बरा त्यामुळे उमरखेड पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने जिल्हा परिषद शाळाकडे तातडीने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली असून विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर याचा परिणाम होऊ नये. यासाठी नादुरुस्त असलेली यंत्रे तातडीने सुरू करावी अशी मागणी पालक वर्गातून होत आहे.
जलशुद्धीकरण यंत्रणेतील मेमरीन कार्बन सेंडीमेंट इत्यादी तांत्रिक बाबीची तत्काळ दुरुस्ती करून दिल्यास सर्वसामान्य विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी प्यायला मिळेल म्हणून संबंधित विभागाने या बाबी कडे लक्ष द्यावे

एजाज पटेल, शिवसेना अल्पसंख्यांक उमरखेड तालुका प्रमुख तथा तालुका संघटक यांची मागणी.
