
जागतिक दिव्यांग दिन समता सप्ताह निमित्त समावेशित शिक्षण विभाग प. स. कळंब अंतर्गत तालुकास्तरीय जागतिक दिव्यांग समता दिन जि. प. उ.प्रा.कन्या शाळा कळंब येथे आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी दिव्यांग विद्यार्थ्यांप्रति जाणीव जागृति व्हावी सामान्य विद्यार्थी व दिव्यांग विद्यार्थी ,पालक शिक्षक आणि समाज यांच्यात संवेदना निर्मिति होउन सर्व दिव्यांग विद्यार्थी मुख्य प्रवाहात आले पाहिजे ह्या उद्देशाची पूर्ति करण्याचे हेतुने गीतगायन,रांगोळी स्पर्धा,चित्रकला स्पर्धा घेण्यात आली.दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रोत्साहन व प्रेरणा मिळावी या करिता स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. अमोल वरसे (गटशिक्षणाधिकारी प. स. कळंब) श्री. हेडाऊ साहेब(शिक्षण विस्तार अधिकारी) सौ. बोरकर मँडम (जिल्हा समावेशित शिक्षण DIET यवतमाळ) यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सुवर्ण पदके व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली.*चित्रकला स्पर्धा,रागोळी स्पर्धा चे परीक्षण शगुफ्ता खान (वि.सा.व्य.) कु. शितल आरगुलवार (वि.सा.व्य.) कु. कांचन वानखेडे (वि.सा.व्य.) कु. तेजस्विनी रहाटे (व.ले.लि.) यांनी केले.कार्यक्रमाचे संचालन कु. सारिका हजारे(मुख्याध्यापक) यांनी केले तर प्रास्ताविक सचिन पोटुरकर (समा.विशेष तज्ञ) यांनी केले
मध्यान्ह गोड भोजन सह कार्यक्रमाचा शेवट करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वी करीता श्री. रतन गोंडे (समा.विशेष तज्ञ) सुजीत भगत,( विशेष शिक्षक) श्री.शंकर आत्राम,(विशेष शिक्षक) श्री.विवेक गोंडे(विशेष शिक्षक) यांनी परीश्रम घेतले. तसेच सर्व साधन व्यक्ती शाळेतील सर्व शिक्षकवर्ग दिव्यांग विद्यार्थी पालक यांचे सहकार्य लाभले.
