आळशी अधिकारी व कामचुक्कार लाईनमन नागरिकांसाठी ठरत आहेत डोकेदुखी,विजेअभावी भोगाव्या लागत आहेत मरण यातना

प्रतिनिधी शेख रमजान बिटरगांव ( बु )

वीज उपकेंद्र बिटरगाव ( बु ) येथे अधिकारी व कामचुक्कार लाईनमन आले तेव्हापासून ग्रामीण बंदी भागातील नागरिकांना नेहमी, नेहमी वीज खंडित होऊन कधी — कधी रात्र रात्रभर अंधारात रात्र काढावी लागत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने डास व मच्छराचे प्रमाण जास्त वाढले आहे. वीज नसल्यामुळे लहान बाळांना व नागरिकांना डास व मच्छर चावल्याने डेंगू, मलेरिया, हिवताप, टाइफाड, निमोनिया सारखे भयानक आजार जडण्याची दाट संभावना आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीच्या मुख्य अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष देऊन वीज पुरवठा सुरळीत करून देणे गरजेचे आहे. वीज उपकेंद्र बिटरगाव येथे नव्याने रुजू झालेले जे. इ. साहेब हे कर्मचाऱ्यावर कोणतीही जिम्मेदारी देत नसल्यामुळे स्थानिक प्रत्येक गावातील लाईनमन कामचुक्कार पणा करताना त्यांच्या कर्तबदारीवरून दिसत आहे. प्रत्येक गावा गावामध्ये एक – एक लाईनमन आहे. पण कोणताही लाइनमन अथवा अधिकारी ग्रामीण बंदी भाग असल्यामुळे स्थानिक राहत नाहीत. वीज हे जीवन आवश्यक आहे हे आपल्याला कोरोना काळातच समजले पण आमच्या इथे असे काही दिसत नाही. काही लाईनमन उमरखेड तर काही ढाणकी शहर वस्तीमध्ये आपला निवास करतात त्यामुळे वीज उपकेंद्र बिटरगाव च्या हद्दीतील गावांमध्ये एकदा लाईन गेली म्हणजे लाईनमन साहेब आंघोळ, जेवण, स्वच्छ कपडे घालून सकाळी 11 किंवा 12 आपल्या गावात येतील तेव्हा गावकऱ्यांना काही वेळासाठी वीज मिळते. अशी वास्तव्य स्थिती वीज उपकेंद्र बिटरगाव येथे सुरू आहे. त्यामुळे बिटरगाव ( बु ) सह ग्रामीण बंदी भागातल्या नागरिकांना आळशी अधिकारी व कामचुकार लाईनमन हे डोकेदुखी ठरले आहे. करिता संबंधित मुख्य अधिकाऱ्यांनी प्रामुख्याने बंदी भागावर लक्ष देऊन विजेचा प्रश्न मार्गी लावावा अन्यथा आम्हाला एकत्रित येऊन तीव्र आंदोलन करून न्याय मागावा लागेल अशी चर्चा प्रत्येक गावातला संतापलेला नागरिक करताना ऐकण्यास मिळतात.