ढाणकी आरोग्य केंद्रातील ऑक्सिजन व्यवस्था बनली आहे शोभेची वस्तू


प्रतिनिधी::प्रवीण जोशी


प्राथमिक आरोग्य केंद्र कोणत्या ना कोणत्या असुविधेमुळे नेहमी चर्चेत राहते. असाच काहीसा प्रकार आज ढाणकी आरोग्य केंद्रात पाहण्यास मिळाला नेहमी प्रमाणे बाह्य रुग्ण तपासणी चालू असताना ढाणकी शहरातील एका अत्यवस्थ रुग्णाला घेऊन त्याचे नातेवाईक आले होते तपासणी नंतर कर्तव्यावर असलेल्या डॉ आंगकाढे यांनी रुग्णाची तपासणी करून ऑक्सिजन लावावे लागेल म्हणून सांगत आरोग्य केंद्रात असलेल्या ऑक्सिजन बंब लावून पाहिला आसता बंब पूर्णतः रिकामा झाला आहे. असे निदर्शनास आले पुन्हा आरोग्य केंद्रातील ऑक्सिजन मशीन लावून पाहिली आसता ती सुद्धा ना दुरुस्त असल्याचे लक्षात आले रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे रुग्नाच्या नातेवाईकांना दिसत होते. त्यामुळे नातेवाईक त्रासून कर्मचाऱ्याला विचारणा करत होते अखेर ढाणकी येथील पत्रकार तथा कोविड काळात ढाणकी शहरात कोविड सेंटर लोकवर्गणीतून उभे करणारे संजय भोसले रोहित वर्मा यांना ऑक्सिजन सिलेंड विषयी विचारणा करताच त्यांनी आरोग्य केंद्रात ऑक्सिजन मशीन घेऊन जात रुग्णाला ऑक्सिजन मशीन लावून दिली त्यामुळे रुग्नाच्या व नातेवाईकाच्या जीवात जीव आल्याचे उपस्थित लोक सांगत होते.
ढाणकी आरोग्य केंद्रातील रुग्नाची होणारी नेहमीची हेळसांड पाहून परत पुन्हा आज तीच घटना कानावर आल्याने शिवसेना उमरखेड तालुका प्रमुख संजय कुंभरवार हे सुद्धा आरोग्य केंद्रात भेट देत वरील प्रकारा विषयी आरोग्य केंद्रातील कर्मचारी यांना विचारणा केली आसता उडवाउडवी चे उत्तर मिळत असल्याने तालुका वैधकीय अधिकारी डॉ मुनेश्वर यांना फोन वरून ढाणकी आरोग्य केंद्रातील सोयीसुविधा त्वरित सुधाराव्या अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला
ढाणकी आरोग्य केंद्रात कुत्रा चावल्या नंतर देण्यात येणारे अँटी रेबीज इंजक्शन उपलब्ध नसल्याची पाटी दर्शनीय भागावर लावून आरोग्य केंद्रातील डॉक्टर बाहेरूनच रुग्णाला पळविल्या जात आहे एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या आरोग्य केंद्रात अँटी रेबीज नसणे ही फार मोठी शोकांतिका असल्याचे सुद्धा नागरिक बोलत होते त्वरित इंजेक्शन उपलब्ध करून देण्याची सुद्धा मागणी करत आहेत
आरोग्य केंद्राला ढाणकी शहरातील नागरिकांनी लोकवर्गणी मधून उभारलेले कोव्हिड सेंटर मधील ऑक्सिजन बंब ऑक्सिजन मशीन भेट दिल्या होत्या त्याही संपल्या नंतर भरून आणण्याची तसदी आरोग्य केंद्र घेत नसेल तर ही शोकांतिका आहे असल्याचे उपस्थित नागरिक बोलत होते. आरोग्य केंद्रात कोणत्या रुग्णाला कधी ऑक्सिजन लावण्याचे काम पडेल याचा काही नेम नाही याची पूर्ण जाणीव असूनही त्याकडे दुर्लक्ष करून फक्त आला रुग्ण कर रेफर एवढंच उपक्रम सध्या आरोग्य केंद्रातून होतांना दिसत आहे आरोग्य केंद्रातील ऑक्सिजन बंब त्वरित भरून आणावे अशी ही मागणी नागरिकांनी केली