
सहसंपादक: रामभाऊ भोयर
महाराष्ट्र शासनाच्या “हरित महाराष्ट्र – समृद्ध महाराष्ट्र” या कार्यक्रमांतर्गत संपूर्ण राज्यात एकूण २ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या उद्देशाने श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यवतमाळ येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात येत आहे. सदर कार्यक्रम मानसून सुरू झाल्या पासून सुरू आहे.
दिनांक १० ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांनी ३०० व ३० ऑगस्ट रोजी अध्यापकांनी २०० वृक्ष रोपट्यांची लागवड केली. दिनांक ११ सप्टेंबर रोजी मा. जिल्हाधिकारी श्री विकास मीना साहेब यांच्या मार्गदर्शनात कर्मचाऱ्यांद्वारे ५०० रोपट्यांची लागवड करण्यात आली. दि. ३० सप्टेंबर रोजी पुन्हा सर्वांच्या सहभागाने ५०० रोपट्यांची लागवड करण्यात आली. निकट भविष्यात परिसरातील मुख्य रस्त्यांचे दोन्ही बाजूने सुशोभीकरणासाठी अजून रोपटे लावण्याचे नियोजित आहे. सदर रोपटे वन विभागाच्या निळोणा येथील नर्सरी मधून पुरविण्यात आले आहेत. असे एकूण जवळपास २००० वृक्ष रोपटे मा. अधिष्ठाता डॉ. अनिल बत्रा व सेवानिवृत्त अधिष्ठाता डॉ. गिरीश जतकर यांच्या मार्गदर्शनात यावर्षी श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय विद्यालय व रुग्णालय यवतमाळ परिसरात लावण्यात येत आहेत. पावसाळा संपल्यानंतर सदर वृक्षांची देखरेख महाविद्यालयात पूर्वीपासून कार्यरत मे. बीव्हीजी इंडिया कंपनीच्या कर्मचाऱ्यांद्वारे करण्याची सूचना मा. अधिष्ठाता यांनी केली आहे.
या कार्यक्रमाचे नियोजन अधिकारी म्हणून उपधिष्ठाता (यूजी) डॉ. पाशु शेख हे कार्यरत असून याकरिता महाविद्यालयातील अधीक्षक डॉ. सुरेंद्र भुयार, उपधिष्ठाता (पीजी) डॉ. आनंद आशिया, उपअधिष्ठाता (प्रशासन) डॉ.आर.के राठोड, अतिविशोपचार ओएसडी डॉ रोहिदास चव्हाण, प्रशासकीय अधिकारी श्री संतोष झिंजे, उपवैद्यकीय अधीक्षक डॉ.अमर सुरजुसे, डॉ. दुर्गेश देशमुख, वैद्यकीय अधिकारी डॉ.अरविंद कुळमेथे, कार्यालय अधीक्षक प्रवीण लिहितकर, अधिसेविका श्रीमती माया मोरे, लिपिक अभय जाधव, सतीश ठाकरे, रुपेश जयदेव, जयराम राठोड, नेहा पाटील, अस्मिता बलिंगे, विशाल राठोड, गणेश ठोंबरे (बीवीजी), लघुलेखक सागर बेले, प्रकाश येनकर, भाग्यश्री मनवर तसेच विद्यालयातील सर्व विद्यार्थी, अध्यापक, अधिकारी, कर्मचारी, नर्सेस, टीम बीव्हीजी व सर्व सुरक्षा रक्षक यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग लाभत आहे.