मुख्यमंत्र्यांच्या हस्ते खैरी ग्रा.प. उपसरपंच डॉ. श्रीकांत राऊत यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

सहसंपादक: रामभाऊ भोयर

खैरी ग्रामपंचायतचे उपसरपंच राळेगाव तालुक्याचे युवा नेते डॉक्टर श्रीकांत ज्ञानेश्वर राऊत यांचा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांचे हस्ते मृद जलसंधारण व आपत्ती व्यवस्थापन कॅबिनेट मंत्री माननीय संजय भाऊ राठोड, शिवसेना शिंदे गट यवतमाळ जिल्हा संपर्कप्रमुख हरिहर भाऊ लिंगनवार, राळेगाव तालुकाप्रमुख मनोज भोयर यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूर येथे शिवसेना शिंदे गट मध्ये जाहीर प्रवेश झाला.
डॉक्टर श्रीकांत राऊत हे राळेगाव तालुक्याचे उभरते नेतृत्व असून त्यांचे वडील डॉक्टर ज्ञानेश्वर पंजाबराव राऊत हे शिवसेनेचे नेते होते ते यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख या पदावर सुद्धा कार्यरत होते. शिवसेना निर्मितीपासूनच यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यात राऊत घराण्यांचे शिवसेनेसाठी मोठे योगदान होते. डॉक्टर श्रीकांत राऊत यांच्या शिवसेना शिंदे गट प्रवेशाने राळेगाव तालुक्यात शिवसेना शिंदे गट मोठ्या भरारीने पुढे येऊ शकतो. त्यामुळेच कॅबिनेट माननीय कॅबिनेट मंत्री संजय भाऊ राठोड यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांचे हस्ते हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपूर येथे त्यांचा पक्षप्रवेश घेतला. श्रीकांत राऊत यांच्या शिवसेना शिंदे गट पक्षप्रवेशाने राळेगाव तालुक्यात शिवसेना शिंदे गटामध्ये व तालुक्यातील जनतेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून डॉक्टर श्रीकांत राऊत यांचे मागे मोठा तरुण वर्ग आहे हे विशेष.