वणी शहरातील मुख्य रस्त्यावर खड्डे. निष्पाप लोकांचे जीव गेल्यावर मुहूर्त निघेल का? युवासेनेचा प्रशासनाला सवाल


प्रतिनिधी :नितेश ताजने ,वणी मारेगाव


वणी नगरपरिषदे अंतर्गत येणारा मुख्य मार्ग टिळक चौक ते जंगली पीर दर्गाह पर्यंतचा रस्ता १ वर्षांपासून त्या रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. त्या रस्त्याची चाळणी झाली आहे. या मार्गावर मागील वर्षापासून अपघाताची मालिका सुरू झाली आहे.या मार्गावर रोज किरकोळ अपघात होत आहे. या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी यासाठी अजिंक्य शेंडे, युवा सेना उपजिल्हा अधिकारी यांनी प्रशासन अधिकारी, तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे. प्रशासन या रस्त्याकडे दुर्लक्ष करीत आहे.या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी जानेवारी २०२३ ला निधी मिळाला आहे.परंतू आज पर्यंत काम सुरू झाले नाही.या मार्गावर जेव्हा एखाद्या मोठा आघात होईल व निष्पाप जिवाचा बळी गेल्यावर रस्ता बांधणीचा मुहूर्त निघणार का? असे निवेदनात नमूद केले आहे.
सध्या पावसाळा सुरू झाला आहे.ज्यामुळे रस्त्यावर पडलेला खड्डा किती खोल आहे. याचा अंदाज बांधता येत नाही.त्यामूळे अपघातात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे.त्यामुळे या रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी युवासेने द्वारे करण्यात आली आहे.जर निवेदन दिल्यापासून ८ दिवसात काम पूर्ण न झाल्यास युवासेना हा मार्ग बंद करून रस्तारोको आंदोलन करण्यात येईल, यावेळेस काही अपप्रकार झाल्यास त्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील असे निवेदनात नमूद केले आहे.या निवेदनामुळे प्रशासन कोणती भूमिका घेणार याकडे वणीकर नागरिकांचे लक्ष लागले आहे.निवेदन देते वेळी युवासेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.