राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील वनोजा येथील ग्रामपंचायत मध्ये शिपाई पदाची नियुक्ती करण्यासाठी ग्रामवासी यांनी राळेगाव येथिल गटविकास अधिकारी यांच्या कडे केली तक्रार सविस्तर वृत्त असे गेल्या ८ महिन्यांपासून वनोजा ग्रामपंचायतला शिपाई नसुन सदर पुर्विच्या शिपायाने घोळ केल्यामुळे संबंधित अधिकारी यांनी त्याला कामावरून कमी केले आहे. तेव्हापासून ग्रामपंचायत कार्यालय वनोजा येथे शिपाई नसल्याने ग्रामपंचायतच्या सर्व कामामध्ये अडथळा निर्माण होत असुन संबंधित अधिकारी जाणीव पुर्वक शिपाई घेण्यास टाळाटाळ करीत आहात. सदर आपणास नम्र विनंती की आपण गावातील बेरोजगारांन कडून अर्ज मागवून एस.सी. एस.टी. ओबीसी.व क्रमवारी लावून नियमानुसार छानणी करावी व नियमानुसार नवीन शिपाईयाची नियुक्ती करावी.व ग्रामपंचायतची खोळबलेली कामे पुर्ववत करावी.जेणेकरुन ग्रामस्थांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी निर्माण होणार नाही व ग्रामपंचायत सुरळीत चालेल. अशी तक्रार गटविकास अधिकारी राळेगाव यांच्या कडे देण्यात आली आहे सदर तक्रार दाखल करतेवेळी.प्रफुल तायवाडे, मोरेश्वर वटाणे,किशोर चिचोने, गोविंदराव चिंचोने हे उपस्थित होते सदर तक्रार अर्जावरील गावातील शेकडो नागरिकांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत पुर्विच्या शिपायानी ग्रामपंचायत कामकाजात घोळ केला म्हणून त्यांना कामावरून कमी केले आहे.हे बरोबर आहे परंतु आठ महिने झाले तरी सुद्धा नविन शिपाई पदाची नियुक्ती केली नाही हे चुकीचे आहे. सदर संबंधित अधिकारी जाणीवपूर्वक शिपाई घेण्यास टाळाटाळ करीत आहेत
प्रफुल्ल दे. तायवाडे माजी
ग्रा.प.उपसरपंच वनोजा
