सुर्ला येथे दुग्धजन्य पदार्थाच्या निर्मितीवर महीलांना प्रशिक्षण

ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्नित आनंद निकेतन कृषी महाविद्याल वरोरा येथील अंतिम वर्षातील विद्यार्थीनींनी सुर्ला येथे दुग्धजन्य पदार्थाच्या निर्मितीवर महिलांना प्रशिक्षण दिले

शेतमजुरी व घरकामे करणार्‍या महीलांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी या हेतूने दुग्धजन्य पदार्थ जसे की पनीर व रसगुल्ला निर्मितीवर प्रशिक्षण देण्यात आले. गाय आणि म्हैसच्या दुधापासून दुग्धजन्य पदार्थ बनविल्याने फक्त त्यांच्या किमतीमधेच वाढ होत नाही तर महिलांसाठी घरघुती व्यवसाय सुरू करण्याची सुवर्ण संधी प्राप्त होते

याच हेतूने कृषीकन्यांद्वारे पनीर व रसगुल्ला बनविण्याचे प्रशिक्षण महिलांना देण्यात आले. या करिता विद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एस. पोतदार सर, कार्यक्रम प्रभारी डॉ. आर. व्ही. महाजन सर, कार्यक्रम समन्वयक डॉ. एस. एन. पंचभाई सर, विषय विशेषज्ञ डॉ एस.जे. गाजरलावार सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

यामध्ये ऋतुजा खडसे, सुनिता खोकले, राजश्री कोळसे, हर्षल मेंढे, प्रणाली नेमाडे, श्रुती पांडे या कृषीकन्यांचा समावेश होता.