
प्रतिनिधी, प्रवीण जोशी
ढाणकी
ढाणकी शहरातील हनुमान मंदिरात कार्तिक महिन्या निमित्त काकड आरतीचे आयोजन करण्यात आले. असून या ठिकाणी विविध प्रकारचे साधुसंतांनी रचलेल्या सुंदर अशा ओव्या ऐकावयास मिळत आहेत जसे की.
“उठा पांडुरंगा आता दर्शन दया सकळा, झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा.” अशा प्रकारची सुंदर आणि भक्तिमय रचना ऐकावयास मिळत आहे.
या ठिकाणी महिला व पुरुषांचा उत्साह तर आहे शिवाय वृद्धांचा सुद्धा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून येतो कार्तिक महिन्याच्या अगदी सुरुवाती पासूनच नियमित न चुकता सकाळी काकड आरती होत असून अगदी ही आरती प्रातःकाळी करण्यात येत आहे काकड आरतीचे प्रयोजन हे कोजागिरी पौर्णिमेपासून सुरुवात होते व ती आरती त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत अखंडपणे व अविरतपणे चालू राहणार आहे वारकरी सांप्रदायात काकड आरतीचे अनन्य साधारण महत्त्व असते. विशेष करून ग्रामीण भागात आणि शहरी भागात सुद्धा सकाळच्या काकड आरती मुळे वातावरण भक्तीमय होऊन वातावरणात प्रसन्नता येत आहे.
