
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
जागजई गावात मागील काही
दिवसांपासून अवैध व्यवसायाने चांगलेच डोके वर काढले आहे.अवैध दारूविक्री व्यवसाय राजरोसपणे सुरू आहेत. दारूविक्रेते व मद्यपींनी गावातील सार्वजनिक परिसरात दारूची सर्रास विक्री होत असून, मद्यपी गावात परिसरात ठाण मांडून असतात. दारूची झिंग चढली की, अश्लील शिवीगाळ करतात. याबाबत राळेगाव पोलिसांना रितसर लेखी तक्रार करण्यात आली. गावातील एका महिलेने दारूच्या वाढत्या प्रकारामुळे विष प्राशन केल्याचीही चर्चा आहे.
राळेगाव तालुक्यातील जागजाई गावात अवैध व्यवसायांचा बोलबाला असून, यावर पायबंद घालणे कठीण झाले आहे. त्यामुळे गावातील दारूविक्रीसह अन्य अवैध व्यवसायांवर पायबंद घालावा, अशी मागणी जागजई ग्रामपंचायत सदस्यांनी व ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे. जागजई गावात मागील काही दिवसांपासून अवैध व्यवसायाने चांगले डोके वर काढले आहे.अवैध दारूविक्रीसह व्यवसाय राजरोसपणे सुरू आहेत. मध्य प्रेमी दारूची झिंग चढली की, अश्लील शिवीगाळ करतात. याबाबत राळेगाव पोलिसांना रितसर लेखी तक्रार करण्यात आली. ग्रामपंचायत सदस्यांकडे नागरिक या त्रासाची कैफीयत मांडत असल्याने आम्ही अनेकदा अवैध व्यावसायिकांना समज देण्याचा प्रयत्न केला, तर ते ग्रामस्थांना शिवीगाळ करतात तरी तात्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
