
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील पिंप्रि (दु) येथील लखन परमेश्वर मेश्राम वय २४ वर्ष यांचा २ फेब्रुवारीला पवन जिनिंग येथे नेहमीप्रमाणे आपले काम करित असताना तेथे कांम्प्रेसर पाईपाने त्याच्या शरीरात हवा शिरली , त्यामुळे त्याला राळेगाव येथे उपचार करून यवतमाळला हलवण्यात आले. त्यात त्यांची आजपर्यंत ३ वेळा सर्जरी करण्यात आली आहे,व त्याला गंभीर दुखापत असल्याने पुन्हा त्याची सर्जरी होणार आहे, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सुचविले, हा आदिवासी समाजाचा कामगार गेल्या ३ वर्षांपासून पवन जिनिंग येथे काम करित असताना सुद्धा त्याला आजपर्यंत कामगार कायद्यानुसार कोणतीही नुकसान भरपाई देण्यात आली नसून व राळेगाव पोलिस स्टेशनच्या वतीने गेल्या सहा ते सात महिन्यापासून कारवाई न झाल्याने याची माहिती मिळताच राळेगाव तालुक्यातील भारत राष्ट्र समिती (बी आर एस) पदाधिकारी आशिष भोयर यांनी या प्रकरणाची गांभीर्यता लक्षात घेऊन वरिष्ठांशी चर्चा केली असता आरोपीला आज रोजी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला त्या प्रत्यक्षात कामगाराच्या घरी जाऊन अमरावती विभाग महिला संघटक उइके ताई आणि पश्चिम विदर्भ समन्वयक निखिल देशमुख जोपर्यंत कामगार कायद्यानुसार त्याला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही , असे वक्तव्य यांनी केले आहे भारत रास्ट समिती (बी आर एस) यांच्या कडून होत असलेल्या जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याच्या कामाला सर्व स्तरावरून स्वागत होत आहे.
