
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुका पत्रकार संघटनेचे सदस्य तथा दैनिक नमो महाराष्ट्र वृत्तपत्राचे तालुका प्रतिनिधी राष्ट्रपाल भोंगाडे यांना दर्पण रत्न पुरस्कार जाहीर झाला असून त्यांना बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त ६ जानेवारी रोजी मलकापूर येथील मराठा मंगल कार्यालय हॉलमध्ये दर्पण रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
आंतरराष्ट्रीय नामांकन प्राप्त हिंदी मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिनानिमित्त सामाजिक उपक्रमाचा भाग म्हणून विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तुत्ववान व्यक्तीचा सत्कार करण्यासाठी राज्यस्तरीय दर्पण रत्न पुरस्काराचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये राळेगाव तालुक्यातील दीर्घकाळ सातत्यपूर्ण निर्भड आणि समाजभिमुख पत्रकारिता करणाऱ्या राष्ट्रपाल भोंगाडे यांच्या कार्याची दखल घेत हा दर्पण रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला असून त्यांच्या निवडीची माहिती जाहीर होताच पत्रकारिता व सामाजिक राजकीय क्षेत्रात व सर्वत्र कौतुक होत आहे. यापूर्वीही राष्ट्रपाल
भोंगाडे हे बऱ्याच वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात काम करीत असून ते ग्रामीण प्रश्न सामाजिक न्याय विकासाचे मुद्दे ,शेतकरी,कष्टकरी वर्ग आणि स्थानिक जनतेचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्याचे काम या पत्रकारीताक्षेत्रातून करीत असून त्यांना राज्यस्तरीय साहित्यरत्न मानव सेवा पुरस्कार,लेखनी रत्न पुरस्कार, बळीराजा चेतना अभियान पुरस्कार,आदी पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
