
सहसंपादक : रामभाऊ भोयर
यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यात विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे उमेदवार श्री दिलीप कडू सर यांनी अनेक शाळांमध्ये भेटी देऊन शिक्षकांच्या अडचणी, शैक्षणिक प्रश्न तसेच संघटनात्मक बाबींवर सविस्तर चर्चा केली.
या भेटीदरम्यान त्यांनी खालील शाळांना भेट दिली –यामध्ये
राष्ट्रीय विद्यालय राजुर कॉलनी वणी, आदर्श विद्यालय मार्डी, राष्ट्रीय विद्यालय हिवरा, लोकप्रिय विद्यालय पेटूर, राजे संभाजी कनिष्ठ महाविद्यालय कायर, सरस्वती विद्यालय, पुनकाबाई माध्यमिक उच्च माध्यमिक आश्रम शाळा मुकुटबन, शेतकरी विकास विद्यालय मांगली, जीवन विधाते विद्यालय मार्की, राजीव माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय झरी, राजीव माध्यमिक आश्रम शाळा पाटण, आदर्श हायस्कूल घोंसा, राजश्री शाहू महाराज हिंदी विद्यालय वनी, गिरजाबाई विद्यालय मंदर, न्यू इंग्लिश हायस्कूल पुनवट, तुकडोजी महाराज माध्यमिक विद्यालय भालर, गुरुदेव विद्यालय शिरपूर, बाबा पाटील पिंपळकर माध्यमिक विद्यालय मेंढोली, लक्ष्मीबाई राजगडकर माध्यमिक आश्रम शाळा शिरपूर तसेच आदर्श हायस्कूल वणी तालुक्यातया दौऱ्यात राज्य शिक्षक संघ समर्पित विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामध्ये विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे उमेदवार दिलीप कडू सर, सुरेंद्र कडू सर, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे यवतमाळ जिल्हा कार्यवाह श्री रामकृष्ण जिवतोडे सर, मुख्याध्यापक दयालाल भोयर सर,विलास वाघमारे सर, सुभाष ताजने सर, दिवाकर नरुले सर, किशोर बोढे सर, शाम बोढे सर, राजेंद्र खोंडे सर, वैजनाथ खडसे सर, भुपेंद्र देरकर सर, दौलत घुगुल सर, पांडुरंग वैद्य सर, दत्तू महाकुलकर सर, ज्ञानेश्वर दातारकर सर, सुनिल लखमापूरे सर, प्रतिश लखमापूरे सर, पंकज राठोड सर, प्रकाश देवाळकर सर, संतोष बेलेकर सर आणि अतुल गोंडे सर यांचा समावेश होता.
या भेटीद्वारे शिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून संघटन अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. शिक्षकांच्या हक्कांसाठी आणि शैक्षणिक गुणवत्ता वृद्धीसाठी एकजुटीने कार्य करण्याचा संदेश या दौऱ्यातून देण्यात आला.
