शिक्षक सेनेतर्फे विस्तार अधिकारी नरेश भोयर यांचा सत्कार

काटोल प्रतिनिधी:ऋषिकेश जवंजाळ


शिक्षण विभाग, पंचायत समिती, काटोल येथे पदोन्नतीने शिक्षण विस्तार अधिकारी पदावर रुजू झालेले नरेश शामरावजी भोयर यांचा महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना, काटोल तर्फे शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी दिनेश धवड तर प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी संतोष सोनटक्के, शिक्षक नेते शेषराव टाकळखेडे, शिक्षक सेनेचे तालुकाध्यक्ष विजय धवड प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय वंजारी, संचालन राजेंद्र बोरकर तर आभार प्रदर्शन किरण डांगोरे यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिलीप वरोकर, दामोधर कुटे, सुरेश बोरकर, अनिल जैवार, तुळशीदास फुटाणे, रविंद्र फिस्के, अनिल बानाईत, संजय कडू, कमलाकर भिंगारे यांनी परिश्रम घेतले.