
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव पंचायत समिती अंतर्गत असलेल्या सर्वोदय विद्यालय, रिधोरा येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त शाळेच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात एस.एस.सी. शालांत परीक्षा २०२५ मध्ये ८१ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावलेल्या नकुल गजानन स्वरूपवार यांच्या हस्ते ध्वजारोहणाने झाली.
यानंतर मुख्याध्यापक टी. झेड. माथनकर तसेच शिक्षक व्हि. एन. लोडे, पी. पी. आसुटकर, आर. एस. वाघमारे, बी. बी. कामडी, व्हि. टी. दुमोरे, एस. एम. बावणे आणि एस. वाय. भोयर यांच्या उपस्थितीत शाळेचे दोन माजी विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
प्रज्वल मोहन पेंदोर – अत्यंत गरीब आणि वडील नसलेल्या कुटुंबातील असूनदेखील, मेहनतीच्या जोरावर गव्हर्नमेंट कोट्यामधून एम.बी.बी.एस.साठी निवड.
अमन हरीश काळे – शेतकरी कुटुंबातील असूनही सर्व अडचणींवर मात करून एम.बी.बी.एस.मध्ये प्रवेश.
दोन्ही विद्यार्थ्यांनी सर्वसामान्य परिस्थितीवर मात करून मिळवलेले हे यश प्रेरणादायी ठरले असून, गावात त्यांच्या यशाचा सर्वत्र गौरव होत आहे.
कार्यक्रमाला सरपंच उमेशभाऊ गौळकर, पोलिस पाटील ढगेश्वर मांदाडे, गावातील मान्यवर नागरिक तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
