
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील अनेक ग्राम पंचायतचा कालावधी पूर्ण झाला असल्याने त्या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने शासनाचे प्रशासक म्हणून प्रत्येक ग्रामपंचायतीचे सरपंच यांना प्रशासक म्हणून नियुक्त केले असले तरी त्यांना प्रशासक म्हणून कार्यभार सांभाळत असताना ज्या काही नियमित समस्या सोडवण्यासाठी कुठल्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार प्रशासकाकडे ठेवले नसल्याने आज दिनांक २२/०५/२०२६ रोजी सरपंच संघटना राळेगाव तालुका यांच्या वतीने गटविकास अधिकारी राळेगाव यांना निवेदन देण्यात आले असून निवेदनात आर्थिक व्यवहार करण्याचे अधिकार मिळण्याची विनंती केली असून निवेदन सादर करताना सरपंच संघटनेचे राळेगाव तालुका अध्यक्ष अंकुश मुनेश्वर, सुधीर जवादे, रामकृष्ण बोरकर, प्रकाश लोहांडे , सुधाकर बोरकर,बंडू बेले यांच्या सह अनेक सरपंच बंधू भगिनी उपस्थित होते.
