
हिमायतनगर तालुका प्रतिनिधी. प्रशांत राहुलवाड
संतोषी चंद्रकांत कोळी यांची आझाद आदिवासी कोळी महादेव सामाजिक संघटनेच्या धाराशिव जिल्हा अध्यक्ष पदि नियुक्ती करण्यात आली.
आझाद आदिवासी कोळी महादेव सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय हनमंतराव मामीलवाड साहेब महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष परमेश्वर पाटील भिमलवाड यांच्या हस्ते संतोषी कोळी यांना निवडीचे पत्र देण्यात आले . तसेच मुख्य मार्गदर्शक नरसिंग भाऊ आयलेवाड, महासचिव गंगाधर जक्कुलवाड, युवा प्रदेशाध्यक्ष सुनिल पिलेवाड, मराठवाडा अध्यक्ष भागीनाथ गोरे, मराठवाडा कार्याध्यक्ष पवनकुमार पुट्टेवाड, महाराष्ट्र संपर्क प्रमुख गजानन तोटेवाड, महाराष्ट्र कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर भिसे खान्देश विभाग अध्यक्ष अतुल कोळी जळगाव जिल्हा अध्यक्ष दिगंबर सोनवणे महिला आघाडीच्या लातुर जिल्हा अध्यक्षा वनिता ताई जमादार, नांदेड ग्रामीण जिल्हाध्यक्ष विकी जुगुलवाड, नांदेड जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश कुरेवाड यांच्या उपस्थितीत संतोषी कोळी यांची निवड करण्यात आली.
त्यावेळी आयोजित कार्यक्रमात संतोषी कोळी म्हणाल्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमचे मार्गदर्शक परमेश्वर पाटील भिमलवाड यांनी माझ्या वर विश्वास ठेवून मला खुप मोठी जबाबदारी दिली आहे.
मी संधीच सोन करून आझाद आदिवासी कोळी महादेव सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य शहरा पासून ग्रामीण भागात पोहचवण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करीन संघटनेच्या या भागात स्थापन करून समाज सेवा करण्याची इच्छा असणाऱ्या नागरिकांना संघटनेशी जोडुन जास्तीत जास्त य संघटनेचे सदस्य करण्यास प्राधान्याने प्रयत्न करुन माझ्या वर जो विश्वास दाखवला तो स्वार्थ ठरवील.
आझाद आदिवासी कोळी महादेव सामाजिक संघटनेच्या माध्यमातून महिलांचे सबलीकरण व्हावे यासाठी मी प्रयत्न करीन महिलांचे आर्थिक सबलीकरण झाल्यास त्यांचे परावलंबित्व दुर होऊन त्या सक्षम होतील तसेच स्वयंविकासातुन कौटुंबिक विकासही साधतील असा विश्वास संतोषी कोळी यांनी व्यक्त केला,
